Tuesday, June 19, 2012

नरके यांनी आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी!


महार कोण होते? उदगम: संक्रमण: झेप या नावाचे पुस्तक संजय सोनवणी यांनी बाजारात आणले आहे. या पुस्तकाच्या खपासाठी प्रमोशन प्रोग्राम घेतले जात आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक समाज शिक्षण अभियान ही पावसाळी छत्री करत आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा शुद्धोधन आहेर, प्रा. विजय मोहिते ईत्यादी आहेत.
या कंपुने पहिला प्रमोशनल कार्यक्रम डॉ.आंबेडकर भवन, दादर येथे घेतला. या कार्यक्रमाला खुद्द लेखक संजय सोनवणी व पंडीत हरी नरके उपस्थित होते. हा कार्यक्रम 24 फेब्रुवारी रोजी झाला. 5 मार्च रोजी हाच कार्यक्रम दैवज्ञ हॉल, वाशी, नवी मुंबई येथे त्याच यशस्वी कलाकारांच्या उपस्थितीत घेतला गेला.
नरके यांनी आंबेडकर भवन येथे आपल्या भाषणात आरोप केला की, आंबेडकरवादी हे मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी सुपार्‍या घेत आहेत. या गंभीर आरोपाबाबत या अविवेकी वाचाळ माणसाने आपल्या या मुर्खपणाबद्दल आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागायला हवी. त्यांनी कुणावर व्यक्तीगत आरोप केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण सरसकट सर्व आंबेडकरवाद्यांना त्यांनी आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले हा कोणता शहाणपणा? यामुळेच त्यांनी या प्रकरणी जाहीर माफी मागावी अशी समस्त आंबेडकरवाद्यांची मागणी आहे.
वाशी येथील दैवज्ञ भवनात झालेल्या प्रमोशनल कार्यक्रमामध्ये तर नरके नरक ओकले. नरकेंच्या भाषणाच्या सुरुवातीलाच एका बौद्ध बांधवाने महार कोण होते? असे या पुस्तकाचे नाव का ठेवले? पुन्हा पुन्हा महार या शब्दाचा वापर का करता? महार आणि बौद्ध हा वाद निर्माण का करता? वगैरे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु नरके यांनी त्यांना सज्जड दम भरत त्यांना खाली बसायला लावले.  त्यावर बोलताना नरके म्हणाले, हे पुस्तक बौद्धांसाठी लिहीलेले नाही आणि मंचावरील कंपुने टाळ्या वाजवल्या. खरे तर लेखक संजय सोनवणी यांनी आपल्या पुस्तकात हे पुस्तक बौद्धांसाठी नाही असे कुठेही म्हंटलेले नाही. उलट एकूनच पुस्तक वाचल्यानंतर असे स्पष्ट जाणवते की हे पुस्तक केवळ बौद्धांसाठीच लिहिले आहे. आज हे जाहीर आहे की गेली 50 वर्षांपासून तरी बौद्ध समाजच परिवर्तनकारी पुस्तके वाचतो आणि खरेदी करतो. त्यामुळे ज्याला आपल्या पुस्तकाचा खर्च भरुन काढायचा असतो आणि वर कमाई करायची असते त्याने खुशाल बौद्धांमध्ये पुस्तके आणून वितरीत करावीत ह निश्चित झालेले आहे.
या पुस्तक रुपाने आंबेडकरी समाजात महार व बौद्ध अशी दुही माजविणे हा या पुस्तकाचा, नरके व त्यांच्या कंपुचा छुपा अजेंडा दिसुन येतो. असा हिणकस प्रयत्न या आधीही झाला होता. शिवसेना प्रमुख बाळ ठाकरे यांनी बौद्धेतर दलितांना हिंदु दलित असे म्हणून त्यांचा वेगळा मेळावाही लावला होता चर्मकार, मातंग ढोर, ईत्यादी उमेदवारांना निवडणूकांमध्ये तिकीटे देऊन निवडूनही आणलेले आहे. बौद्धांपासून इतर दलितांना तोडण्यासाठी सर्वच प्रस्थापित वेगवेगळ्या प्रयुक्त्या वापरीत असतात. त्यात आता नरके आणि कंपुची भर पडली आहे. आंबेडकरवाद्यांवर सुपारीचा आरोप करणार्‍या या कंपुने स्वत: कुणाची सुपारी घेतली आहे की काय असे वाटण्या इतपत त्यांचे वर्तन बेताल होत आहे.
त्यानिमित्ताने एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, ओबीसींच्या आरक्षणाविषयी पूर्वाश्रमीच्या महारांना रस्त्यावर उतरविण्यासाठी नरके खटाटोप करीत आहेत. मराठा सेवा संघाचे व शिवधर्माचे पुरषोत्तम खेडेकर यांच्यावर टीका करताना खेडेकरांच्या एका पुस्तकातील ब्राह्मण स्त्रीयाविषयी अतिशय नीचांक गाठणारे लेखक वाचून दाखवितात. खेडेकरांनी आपल्या पत्नीला बीजेपीच्या तिकीटावर निवडणूक लढवून आमदार केले. मराठा हे सर्व सत्ता गिळंकृत करीत आहेत. मराठे ओपन सीट मधून निवडून येतातच. परंतु त्यांची भुक आणखी वाढली आहे. त्यामुळे ओबीसीच्या जातप्रमाणपत्रावर आता ओबीसी कोट्यातूनही ते निवडणूका लढवितात. इतर सवलती लाटत आहेत. आणि अशा मराठ्यांना बामसेफचे वामन मेश्राम मदत करीत आहेत, सुपार्‍या घेत आहेत असे गंभीर आरोप नरके यांनी केले. अर्थात या आरोपांचे उत्तर खेडेकर आणि मेश्राम देतीलच!
आपली भाषणबाजी पुढे रेटताना नरके पुढे म्हणतात, तुम्ही बौद्ध लोक 1 जानेवारीला भीमा कोरेगांवला का जाता? तुमची नक्की अस्मिता कुठली? महार की बौद्? तुमचा काय संबंध? असे विचारुन ते पुढे असेही म्हणतात कि, महारांनी भीमा कोरेगांवचा लढा लढून पेशवाईचा अंत केला असला, त्याप्रसंगी नेतृत्व जरी केले असले व बहुसंख्येने महार असले तरी एखादा माळी, एखादा चर्मकार, मातंग, कुणबी इत्यादि जातीतील सैनिकही प्राण पणाला लावून लढले त्यांचा विसर पडता कामा नये.
इथे एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा की, पुर्वाश्रमीचे महार आजचे बौद्ध केवळ महार योद्धांना सलामी द्यायला जातात असा नरकेंचा समज असावा. एवढ्या कोत्या बुद्धीचे बौद्धजन नाहीत हे नरकेंना भांडारकर इंस्टीट्युटमध्ये बसून पोथ्यापुराणात सापडणार नाही. हे कळण्यासाठी अर्थातच सच्चा दिलाने बौद्धमय व्हायला लागेल.
आम्ही या प्रसंगी असे विचारतो की तुम्हाला आणि एकुणच पुर्वाश्रमीच्या महारांना सोडून इतर समाजाला भीमा कोरेगांव येथे जायला कोणी प्रतिबंध केला आहे? आता तरी तेथे जा! लाखो कोटींच्या संख्येने जा. आणि ब्राह्मणीधर्म संपविण्याच्या जिद्दीने धारातिर्थी पडलेल्या तुमच्या पुर्वजाची जाऊन तेथे माफी मागा आणि म्हणा की, आम्ही नालायक आहोत तुम्हाला गेली शंभर वर्षे ओळखु शकलो नाही. तुमच्या शौर्यासमोर नतमस्तक झालो नाही याची आम्हाला लाज वाटते आहे. अशा प्रकारे नरकेंनी भीमा कोरेगांवला जाऊन एकदा तरी मनापासून गुढगे टेकले तरी ते धन्य होतील.
ओबीसींच्या आरक्षणाबाबत ओबीसी स्वत: संवेदनशील नाहीत आणि गंभीर ही नाहीत. परंतु आंबेडकरवादि पूर्णत: ग्ंभीर आहेत. आज ओबीसी ब्राह्मणी गुलामगिरीच्या कच्याट्यात पूर्णत: अडकला आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजईय संपुर्णपणे तो ब्राह्मणी तंबूतच आहे. याची कल्पना आंबेडकरवाद्यांना आहे. म्हणूणच त्यांच्या रक्षाणी आणि आरक्षणाची जबाबदारी आंबेडकरी समाज घेत आहेत. सातत्याने ब्राह्मणी व्यवस्थेच्या समर्थकांसोबत राहून दलितांवर अत्याचार करण्यामागे ओबीसी पुढे असूनही बुद्धाच्या करुणेने, समता भावनेने, मैत्री भावनेने ओबीसींसाठी आंबेडकरी समाज प्रयत्नशील आहे. बौद्धांनी 55 वर्षात काय केले या प्रश्नाचे उत्तर अर्थातच भांडारकर इंस्टीट्युटच्या पोथ्या पुराणातून मिळणार नाही.
मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात नरके गळा काढत आहेत. मंडल आयोगाअंतर्गत हिमाचल प्रदेश व हरियाणा या दोन राज्यात ब्राह्मणांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळाले. तेव्हा नरकेंना वाईट वाटले नाही. परंतु आज मराठा समाज आरक्षण मागत आहे तर त्याविरुद्ध नरके बरळत आहेत. याबाबत मागासवर्गीय कोण हे ठरविण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जावा व त्या त्या वेळी जे मागास असतील त्यांच्या उत्थानासाठी शासनाने योग्य धोरण आखावे व उपाय योजावेत असे संविधान म्हणते.
त्यामताशी आंबेडकरवादी पुर्ण सहमत आहेत. त्याला विरोध असण्याचे कारण काय? आरक्षण हे मागासांच्या उत्थानासाठी एक सांविधानिक साधन आहे हे खरे आहे. परंतु 52% असलेल्या ओबीसीना आपल्या उत्थानासाठी कुणाची गरज नाही. मात्र स्वत:ला गुलाम करणार्‍या व्यवस्थेशी जो पर्यंत दोन हात करायची तयारी नाही तोपर्यंत ओबीसींची मुक्ती वा स्वातंत्र्य शक्य नाही. आता नरके आणि तत्सम विद्द्वान जर खरेच गंभीर असतील तर ओबीसी समाजाला जागृत करायचे काम पूर्ण ताकदीनीशी करावे. तरच या देशाचे भवितव्य बदलेल. ओबीसीच्या वैचारीक, सास्कृत्तीक सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रबोधनाशिवाय व संघर्षाशिवाय देशाचे राष्ट्रीयत्व सुरक्षित राहणार नाही. एवढी प्रचंड जबाबदारी नरकेसारख्या लोकांवर आहे. महार कोण होते हे महारांना सांगुन काहीच फरक पडणार नाही. सोनवणींच्या पुस्तकात महार रक्षक होते असे म्हंटले आहे. डो. बाबासाहेब आंबेडकरांनी महार हे राज्यकर्ते होते हे सिद्ध केले आहे. तरीही संजय सोनवणींचा खोडसाळपणा आंबेड्करी समाजाच्या डोक्यावर मारण्यात नरकेंना विकृत आनंद मिळाला तरी ओबीसीच्या स्वातंत्र्यलढ्याची जबाबदारी ते स्वत:, सोनवणी व इतर ओबीसी अभ्यासक टाळू शकत नाही. लेखक संजय सोनवणी म्हणतात तसे बाबासाहेबांना कुणीही जातीमध्ये बंद केलेले नाही. आंबेडकरी विचारधारा बंदिस्त केलेली नाही. संजय सोनवणी त्यांच्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हणतात, नरके हे डॉ. आंबेडकरांवरील एकमेव ऑथॅरीटी आहेत. मग रडता कशाला? व्हा सज्ज! जा ओबीसींमध्ये! सांगा त्यांना आंबेडकरवाद म्हणजे काय? ठरवा रणनिती! करा जागृती! हिंम्मत असेल तर करुन दाखवा! परंतु आंबेडकरवाद्यांना दोष देणे बंद करा, नाहीतर तुमचे दात तुमच्या घशात घालण्यास आंबेडकरवादि तयार आहेतच.
(ओबीसींचे प्रबोधन तरी पैसे न घेता करा ही नम्र विनंती)


रिपब्लिकन जनता (मार्च-2012) मासिकातून साभार!

2 comments:

  1. जयभीम.छान विवेचन केले आहे.
    परंतु हरी नरके सारख्या(सत्कारातील शाल अन नारळ आठवणीने सोबत घेवून जाणा-या)माणसासाठी आपल्या अमुल्य मासिकाचे एक पान का वाया घालविले? अजूनही ओ बी सी सोडाच माळी समाजालाच महात्मा फुले आपले वाटतात का?नवबौद्धांचा पुळका असणा-या हरीने कुठल्या आंबेडकरी चळवळीच्या उमेदवाराचा कधी प्रचार केला.दुस-या बाजूला किती व्याख्याने ओ बी सी समाजाने अन किती आंबेडकरी चालवणे हरीचे आयोजित केली आहेत? म्हणून हा नरके आपला नाही. त्यचे तिथेच मुस्कट झोडायचे होते.

    ReplyDelete
  2. sir uttam lekh ahe aapla hari narke samajwadi brahmananchya kamput javun swatha brahman zalyasarkha vagat ahe.....

    ReplyDelete