Friday, December 23, 2011

मी रिपब्लिकन का आहे? (भाग-1)

मी रिपब्लिकन आहे

कारण------------

        कारण डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे माझे सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी रिपब्लिकन विचारधारा(संकल्पना) दिली आहे. त्यात बाबासाहेबांची कित्येक वर्षांची ज्ञानतपस्या, प्रज्ञा, शीलवान चारित्र्य आणि जगातील प्रत्येक माणसाबद्दल असलेली करुणा पुर्णपणे दिसुन येते. बाबासाहेबांचे व्हीजन, सम्यक दृष्टीकोन त्यातुन पुर्णपणे व्यक्त होतो. रिपब्लिकन विचारधारेत जगाच्या पुनर्रचनेची परिपुर्ण ताकद आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे.

रिपब्लिकन संकल्प दिन.

        रिपब्लिकन पार्टी ऑफ ईंडिया स्थापन करण्याच्या दृष्टीने तारिख 30 सप्टेंबर 1956 रोजी नवी दिल्ली येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली  त्यांच्या निवासस्थानी अखिल भारतिय शेडयुल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकारणीची बैठक घेण्यात आली आणी त्यात ठरावाद्वारे अखिल भारतिय रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात त्या बैठकीचा वृत्तांत तारिख 6 आणी 23 ऑक्टोबर 1956 च्या प्रबुद्ध भारतच्या अंकात प्रसिद्ध झाला तो खालील प्रमाणे.

        "अखिल भारतिय शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची कार्यकारीणीची बैठक दिल्ली येथे तारिख 30 सप्टेंबर 1956 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षेतेखाली त्यांच्या निवासस्थानी भरली होती. भारतातील निरनिराळ्या प्रदेशातील  शेड्युल्ड कास्ट फेडरेशनच्या कार्यकारणीचे सभासद हजर होते. कार्यकारणीत चालु राजकिय परिस्थितीवर चर्चा झाली व निरनिराळ्या विषयानुसार ठराव सम्मंत करण्यात आले. शेड्युल्ड कास्ट फेडरेशन या राजकिय पक्षाऐवजी 'अखिल भारतिय रिपब्लिकन पार्टी' या नावाचा राजकिय पक्ष स्थापण्याचा महत्वाचा असा निर्णय घेण्यात आला."

या बैठकिनंतर दोन महिन्यातच बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे बाबासाहेबांच्या हयातीत पक्ष स्थापन झाला नाही. म्हणुनच 30 सप्टेंबर 1956 या दिवसालाच आम्ही "रिपब्लिकन संकल्प दिन" म्हणुन मानतो. कारण याच दिवशी बाबासाहेबानी रिपब्लिकन विचारधारा, संकल्पना दिली आणि पुढे बरोबर 14 दिवसानी म्हणजे 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यानी आम्हाला बुद्धधम्म दिला.

रिपब्लिकन संकल्पना / विचारधारा

 भारतीय संविधानाचा उपोदघात खालीलप्रमाणे आहे.
        "आम्ही भारतीय लोक प्रतिज्ञापूर्वक असे ठरवितो की, भारत हे स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र राहील. आणि त्यातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, भाषण, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य; सन्मानाची व संधीची समानता; व्यक्तीची प्रतिष्ठा  आणि राष्ट्राचे ऎक्य व एकात्मता साधणारे बंधुत्व या गोष्टी मिळवून देण्यासाठी झटू."

भारतीय संविधानाच्या उपोदघातातील ध्येय व उद्दीष्ट साध्य करण्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत.

1) सर्व भारतीयांना समान न्याय हा प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे; असे समजण्यात येईल आणि जेथे समता नाही तेथे ती आणण्यासाठी संघटना झटेल व जेथे ती नाकारण्यात येते तेथे ती राबविण्यासाठी लढा देईल.

2) प्रत्येक व्यक्तीचे सुख व केंद्रबिंदु समजण्यात येईल आणि आपल्या उद्धारास्तव प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीस समान संधी मिळेल. शासन संस्था ही हे साध्य मिळवण्यासाठी वापरावयाचे साधन होय.

3) इतर देश बांधवांचा हक्कांचे व शासन संस्थेच्या आवश्यक तेवढ्या अधिकारांचे संरक्षण करुन प्रत्येक नागरिकांस धार्मिक, आर्थिक व राजकीय स्वातंत्र्य असले पाहिजे असे ही संस्था मानील.

4) प्रत्येक भारतिय नागरिकास समान सन्धीचा अधिकार असल्याचे ही संघटना मान्य करिल अर्थात ज्याना आत्मोन्नतीसाठी कधीच सन्धी मिळाली नाही त्याना सन्धी मिळालेल्या लोकांपेक्षा अग्रक्रम देण्याचे तत्व संघटना अंगिकारेल.
5) प्रत्येक व्यक्ती यास जीवनातील गरजा व भीती या पासुन मुक्ती मिळउन देण्याच्या शासन संस्थेच्या कर्तव्याची जाणीव सरकारला ही संघटना सातत्याने करुन देईल.

6) हि संघटना स्वातंत्र्य, समता व बन्धुता  यांच्या प्रस्थापनेसाठी आग्रह धरील आणि एक माणसाची दुस-या     माणसाकडुन, एका वर्गाची दुस-या वर्गाकडुन किंवा एका देशाची दुस-या राष्ट्राची पिळवणुक व दडपशाही याना पायबन्द घालील.

7)वक्ती व समाज या दोहोंच्या भल्याच्या दृष्टीने संसदीय लोकशाही हीच सर्वश्रेष्ठ राज्यपद्धती आहे अशी या संघटनेची धारणा राहील.

या संकल्पनेनुसार "रिपब्लिकन जनआन्दोलन" या सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे.        "रिपब्लिकन विचारधारा" भारतातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचावी व जगभर तीचा प्रचार,प्रसार करावा या मुख्य हेतुने या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. जगाची पुनर्रचना रिपब्लिकन विचारधारेवर झाल्यास एका धर्मविरहित,वर्ग,वर्ण,जातीविरहीत व शोषणविरहित अश्या सुन्दर जगाची निर्मिती .रक्तविरहीत मार्गाने होउ शकते असा आमचा ठाम विश्वास आहे

प्रा.प्रेमरत्न चौकेकर. 
नवी-मुम्बई
मो.97575088520

1 comment: