Saturday, December 29, 2012
Friday, November 23, 2012
Hanumant Upare and the Riddle of the Shudras

Hanumant Upare
is certainly doing a great job. At Chembur conference the dias was shared by
many respected leaders representing the different OBC castes. They all agreed
that it was the time to think seriously about this issue. It is however true
that most of these leaders don’t have courage to leave Hinduism and embrace the
Buddhism.
The task before
Hanumant Upare is therefore very difficult. Let us discuss the issues with its
gravity by studying how Dr. Ambedkar explores the matter of OBCs i.e. the
Shudras.
Dr. Ambedkar Says,
“Some of those,
who believe that only the acceptance of the Gospel of Buddha can save the Hindus
are filled with sorrow, because they do not see much prospect of the return or
revival of Buddhism in India. I do not share this pessimism.
In the matter of
their attitude to their religion, Hindus today fall into two classes. There are
those who hold that, ‘All religions are true including Hindu and the leaders of
other religions seem to join them in this slogan. There cannot be a thesis more
false than thesis that all religions are true. However, this slogan gives the
Hindus, who have raised it, the support of the followers of other religions.
There are Hindus who have come to realize that there is something wrong with
their religion, the only thing is that they are not ready to denounce it
openly. This attitude is understandable. Religion is a part of one’s social
inheritance. One’s life and dignity and pride are bound up with it. It is not
easy to abandon one’s religion. Patriotism comes in “My country” right or
wrong, “My religion” right or wrong. Instead of abandoning it, the Hindus are
finding escape in other ways. Some are consoling themselves with the thought
that all religions are wrong, so why bother about religion at all. The same
felling of patriotism prevents them from openly embracing Buddhism. Such an
attitude can have only one result. Hinduism will laps and cease to be a force
of governing life. There will be void, which will have the effect of
disintegrating the Hindu Society. Hindus then will be forced to take a more
positive attitude. When they do so, they can turn to nothing except Buddhism.
This is not the only
ray of hope, there are hopes coming from other quarters also.
There is one question,
which every religion must answer. What mental and moral relief does it bring to
the suppressed and the downtrodden? If it does not, then it is doomed. Does
Hinduism give any mental and moral relief to the millions of Backward Classes
and the Scheduled Castes? It does not. Do Hindus expect these Backward Classes
and the Scheduled Castes to live under Hinduism, which gives them no promise of
mental and moral relief? Such an expectation would be an utter futility.
Hinduism is floating on a volcano. To-day it appears to be extinct. But it is
not. It will become active once these mighty millions have become conscious of
their degradation and know that it is largely due to the social philosophy of
the Hindu religion. One is reminded of the overthrow of Paganism by
Christianity in the Roman Empire. When the masses realized that paganism could
give them no mental and moral relief they gave it up and adopted Christianity.
What happened in Rome is sure to happen in India. The Hindu masses when they
are enlightened are sure to turn to Buddhism.”
What Babasaheb means can be
summarised as follows:-
1.
All religions are not true.
2.
All religions are not wrong
3.
The masses stick to “My Religion”
4.
Masses are led by the feeling of patriotism.
5.
This patriotism prevents Hindus from openly
embracing Buddhism.
6.
Instead, they find escape in other ways.
7.
Hinduism does not provide any mental and moral
relief to the millions of Backward Classes and Scheduled Castes.
8.
Hinduism is floating as a Volcano.
9.
This volcano will become alive once this mighty
OBCs will became conscious of their degradation and know that it is largely due
to the Hindu religion.
10.
The Hindu masses when they are enlightened are
sure to turn to Buddhism.
Here Babasaheb
has made it very clear that one day the OBCs will definitely turn to Buddhism.
The process goes through enlightenment. That the OBCs should be made conscious
of their slavery and that their slavery is due to the Brahmanical Social Order.
That their degradation to human in status is due to the Brahmanical laws making
them to fall and decline to the perfect slaves should be made know to them.
However, the
Hindus even after becoming conscious of their slavery and degradation prefer
escapism is very true. In 2005, the enlightened few of the Maratha Community
from Maharashtra tried to establish a new religion in the name of
“Shiv-Dharma”. Not less the person than Dr. A. H. Salunkhe who is scholar and a
well-known writer of several books exposing the Brahmanism to its fullest length,
had taken the lead in this event as a philosopher. A great many activist like Purushottam
Khedekar aslo the leader of the Maratha Seva Sangh took initiative to establish
the “Shiv-Dharma”. But ‘Shiv – Dharma’ has proved to be an escapism.
The Brahmanical
Social Order has produced a great many god men and women who again save the
purpose of escapism.
It is the fact
that all this set of the gods, god men and women, the temples, the chanting and
festivals do not provide any mental relief to the Hindu or any other person as such.
This is a kind of escapism, which detracts the attention of the people from
daily grievances and difficulties. Instead of fighting against the odds of the
life these so-called spiritual paths, provide the run-away techniques to the
masses. Moreover, there is no pinch of morality in all these so called
spiritual ways.
The laws made
against the shudras i.e. OBCs by the Brahmanical law – givers have degraded the
shudras to their lowest status. Dr. Ambedkar has categorized these laws in his
book “Who were the shudras?” (pages 55, 56). They are as follows,
- The Shudra was to take last place in the social order
- That the Shudra was impure and therefore no sacred act should be done within his sight and within his hearing.
- That the Shudra is not to be respected in the same way as the other classes.
- That the life of a Shudra is of no value and anybody may kill him without having to pay compensation and if at all of small value as compare with that of the Brahmin, Kshatriya and Vaishya
- That the Shudra must not aquire knowledge and it is a sin and a crime to give him education.
- That the Shudra must not acquire property. A Brahmin can take his property at his pleasure.
- That a Shudra cannot hold office under the state.
- That the duty and salvation of the Shudra lies in his serving the higher classes.
- That the higher classes must not inter marry with the Shudra, They can however keep a Shudra woman as a concubine. But if the Shudra touches a woman of the higher classes he will be liable to dire punishment.
- That the Shudra is born in servility and must be kept in servility forever.
Anybody going through these Brahmanical
laws will agree that the Brahmins have been very cruel and instrumental
towards the Shudras is OBCs. Brahmins and the Brahmanical social order have
physically, mentally and intellectually degraded the Shudras to the miserable
conditions making then the perfect slaves.
The Shudras i.e. OBCs should now revolt against the Brahmanical social
order. They should now denounce the supremacy of the Brahmanical social order.
This means the Shudras should now throw away the gods, godmen, the religious
books, the illogical traditions and festivals – in short the Hindutva. The Shudras
i.e. OBCs should now do away with the caste system and the casteism. The Shudras
should now get rid of the Brahmanical value system, which is full of inequalities,
slavery, enmity, exploitation and treachery.
The Indian constitution has provided them the great help. They should
now take up the constitutional values viz. Justice, Liberty, Equality and
Fraternity. It should be remembered that these constitutional values have no
meaning in the Brahmanical Social Order. The building of the Indian Nation based
on these Constitutional Values is impossible in the Brahmanical Social Order,
which is directly in contrast to these values. The Indian Nation can be built
and nurtured only in the Buddhist ethos. The Shudra as a mighty force of the
Indian population can change the destiny of the nation. But are the Shudras
ready for this historical responsibility? Have the Shudras become free from the
Brahmanical clutches? The Shudras will not be able to do this Herculean job
till and until they are possessed by Hinduism and Hindutva. Dr. Ambedkar has
given the solution on this problem by bringing all the Shudras out of Hindu fold
and uniting them into the OBC category under the separate schedule in the
constitution.
Hanumant Upare an enlightened OBC leader seems to realize this
responsibility of setting the Dhammchakra Pravartan for the OBCs and thus
serving this great Nation.
The task is not so easy. There are many obstacles. In the foreface written
to his book ‘Who were Shudras?’ Dr. Ambedkar has described the five classes of
Hindus. He says,
- There is a class of Hindus, who are known as Orthodox and who will not admit that there is anything wrong with the Hindu social system. To talk of reforming it is to them rank blasphemy.
- There is class of Hindus, who are known as Arya Samajists. They believe in the Vedas and only the Vedas. They differ from the orthodox in as much as they discard everything, which is not in the Vedas. Their gospel is that of return to Vedas.
- There is a class of Hindus, who will admit that the Hindu social system is wrong, but who hold that there is no necessity to attack it. Their argument is that since law does not recognize it, it is dying, if not a dead system.
- There is a class of Hindus, who are politically minded. They are indifferent to such questions. To them swaraj is more important than social reform.
- The fifth class of Hindus are those who are rationalists and who regard social reforms as of primary importance; even more important than swaraj.”
This
classification is true to the facts even in contemporary India, more than
seventy years after it was described by Dr. Ambedkar.
The Brahmanical
Social System has systematically developed the class of orthodox into more
staunch believers in orthodoxy by commercializing the Gods, god men, temples
and festivals and by molding even the modern science into pseudoscience like
‘Vastushastra’ , ‘Astrology’ and much more.
The Vedic schools spreading the Vedas
and other outdated Brahmanical Scriptures are proliferating.
The class of Hindus admitting the wrongs in the system is not ready to
correct them, as they believe that now the Indian Constitution and Democracy
will slowly change this ugly scenario.
The class of Hindus, which was much
interested in swaraj than social reforms, has now taken the politics as a full
time job making a lot of property and prosperity in their own life. They have
corrupted the Indian Constitution and the Indian Democracy.
These are the facts in modern India. Dr.
Ambedkar had therefore correctly believed in the fifth class of Hindus who
think rationally.
After a brief discussion on first four
classes of Hindus and having no hopes from them Dr. Ambedkar says further, “The
only class of Hindus who are likely to welcome the book are those who believe
in the necessity and urgency of social reforms. The fact that it is a problem,
which will certainly take a long time to solve and will call the efforts of
many generations to come, is in their opinion, no justification for postponing
the study that problem. Even an ardent Hindu politician, if he is honest, will
admit that the problems arising out of the malignant form of communalism, which
is inherent in the Hindu Social Organization and which the politically minded
Hindus desire to ignore or postpone, invariably return to plague those very
politicians at every turn. These problems are not the difficulties of the
moment. They are our permanent difficulties, I.e. difficulties of every movement.
I am glad to know that such a class of Hindus exists. Small though they be they
are my main stay and it is to them that I have addressed my argument.”
Dr. Ambedkar further says, ‘The book is written
for ignorant and uninformed Shudras, who do not know how they came to be what
they are. They do not care how artistically the theme is handled.’
The OBCs i.e. Shudras in the Brahmanical
Social System form the major population of India. In democratic India, the
parliamentary politics can be fully controlled and monitored by OBCs. The
enlightenment of OBCs will change the destiny of the nation. Dr. Ambedkar is
very well aware of this fact. ‘Who were the Shudras?’ was specially written by
Dr. Ambedkar for the enlightenment of these Shudras.
The activists like Hanumant Upare who
are enlightened are following a path shown by Dr. Babasaheb Ambedkar to solve
riddle of Shudras.
Let us be part of the struggle for
emancipation of Shudras by remembering Dr. Babasaheb Ambedkar when he says,
“When one remembers that it is the Shudras, who have largely been instrumental
in sustaining the infamous system of Chaturvarnya, though it has been the
primary cause of their degradation and that, only the Shudras can destroy the
Chaturvarnya, it would be easy to realize why I allowed the necessity of
educating and thereby preparing the Shudras fully for such a sacred task to out
weigh all other considerations which favored the deletion or if not deletion
the abridgement of the quotations.”
----- Prof. Premratna Chaukekar
Sunday, July 8, 2012
तुका झालासे कळस!
संत तुकाराम
महाराजांना तुका झालासे कळस म्हणून डोक्यावर घेणार्या महाराष्ट्राला तुकोबाच्या
क्रांतीकारी कार्याचा परिचय अजून योग्यप्रकारे झाला नाही. असे खेदाने म्हणावे
लागेल. विद्रोही तुकाराम लिहून डॉ.आ.ह.साळुंखे यांनी एक टप्पा पार केला आहे.
तुकाराम महाराज वीस
वर्षाचे असताना एक दिवस अचानक गायब झाले. बंधू कान्होबाने शोध घेतल्यावर त्यांना
तुकाराम सात दिवसानंतर देहू जवळच्या बांबनाथ डोंगरावर सापडले. कान्होबा त्यांना
घरी घेऊन येत असताना तुकारामांनी त्यांना इंद्रायणीच्या डोहाजवळ बसवले. कान्होबाला
घरी जाऊन कर्जखाते आणायला सांगितले. कान्होबांनी कर्जखाते आणल्यानंतर त्यांनी
त्याचे दोन भाग केले. एक भाग कान्होबाला दिला. आपल्या वाटेला आलेला भाग
तुकारामांनी इंद्रायणीच्या डोहात बुडविला. कर्जखते इंद्रायणीत बुडवली.
वडिलोपार्जित महाजनकीतून स्वत:ला मुक्त केले. लोकांचे शोषण करुन त्यावर जगण्याचे
शोषणाचे साधन त्यांनी बुडविले. तुकाराम वर्गविरहीत (DECLASS) झाले. मात्र कान्होबावर त्यांनी कशा प्रकारची जबरदस्ती केली नाही. क्रांती
स्वत:पासून सुरु होते याचा बुद्धप्रणित आदर्श त्यांनी समाजापुढे ठेवला. आदर्शाच्या
आतंकवादाला त्यांनी नकार दिला आणि कान्होबाचा निर्णय कान्होबावर सोपविला.
येथे संत सेना महाराज पंचशील तोडले तर माणूस कसा
दारिद्री होऊन दु:ख भोगतो ते सांगत आहेत. आणि सर्व प्रकारचे थकल्यावर नागवल्यावर
माणूस देव पुजेला लागलो. याबद्दल सेना महाराज निषेध करीत आहेत. अशाप्रकारे
बुद्धाचीच वाणी तेराव्या शतकात जनमाणसांपर्यंत नेण्यासाठी संत सेना महाराज पंजाब
पर्यंतही गेले. त्यांचे अभंग मराठी बरोबरच हिंदी व पंजाबी, राजस्थानी भाषेतही
आहेत. संत सेना महाराज हे ज्ञानेश्वरांचा जन्म 1275चा. त्या अगोदरच पिढी
25वर्षांनी मोठी गृहित धरली तरी संत सेना महाराजांचा जन्म 1250 च्या पुर्वाचा
ठरतो. ज्ञानेश्वरांच्या सुद्धा अगोदर त्यांनी विठठलाची म्हणजे पंढरपुरची वारी
केलेली आहे. म्हणूनच ज्ञानियाने रचला पाया। तुका झालासी कळस हे विधान खोटे ठरते.
खरे तर संत सेनाने रचिला पाया। तुका झालासे कळस हेच विधान बहुजन चळवळीच्या
समतेच्या संघर्षातील योग्य विधान ठरेल.

या घटनेचा अर्थ तुकारामांनी भांबनाथ पर्वतावर एकांतात घालविलेले दिवस देव, आत्मा, परमात्मा
अशा पोकळ अध्यात्मिक विषयांवर चिंतनात न घालविता सामाजिक व आर्थिक शोषणाबाबत
मूलभूत चिंतनात घालविले. त्यानंतर समाजात पुन्हा आले ते क्रांतीकारक म्हणूनच.
पुढील 20 वर्षामध्ये
तुकारामांनी भल्याभल्यांना जेरीस आणले. वैदिक, पंडीत, श्रोतिय, याज्ञिक, योगी गुरु
इत्यादी नानाविध रुपांनी व नावांनी वावरणार्या परंतु प्रत्यक्षात भोंदूगिरी
करणार्या ढोंगी लोकांचे बुरखे फाडण्याचे काम सातत्याने केले.
तुकाराम
वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था यांनाही नकार देतात.
वर्णाभिमान विसरली याति।
एकएका लोटांगणी जाती।।
निर्मळ चित्ते जाली नवनीते।
पाषाण पाझर सुटती रे॥
तुकोबाच्या क्रांतीकारी
चळवळीती माणसे वर्णव्यवस्था व जातीव्यवस्थेला नकार देऊन चित्त परिशुद्धिच्या
बुद्धप्रणित मार्गावर चालताना आपल्याला दिसतात. त्यामुळे त्यांच्या चित्तातील मळ
नष्ट झाला आहे अशा प्रकारे वर्ण व जातीव्यवस्था नाकारून तुकाराम जातीवर्ण विरहीत (DECAST) होतात.
क्रांतीला निघालेल्या
माणसाला स्वत: वर्गविरहीत व जातीविरहीत व्हावेच लागते. स्वत:ला ब्राह्मण्यमूक्त
करायला लागते. तुकाराम महाराज (DEBRAHAMANISED)
म्हणजे ब्राह्मण्य मुक्त
होतात. स्वत: ब्राह्मण्यातून
बाहेर न पडता परिवर्तन करणे शक्य नसते.
तुकारामांनी पारंपारिक संसार केला नाही. हे खरे
आहे. परंतु संसार सोडला ही नाही ध्येयनिष्ठेमुळे संसाराकडे अनेकांचे दुर्लक्ष होते
हे खरे आहे. कर्जखते बुडबून शोषणांचे साधन नष्ट करणार्या तुकारामांनी स्वत:च्या
जमिनीची कागदपत्रे मात्र बुडविली किंवा नष्ट केली नाहीत. पंधरा बिघ्याहून जास्त
जमीन त्यांच्या नावावर होती. शेती करुन आपल्या पत्नी व मुलांचे पालनपोषण केले.
बुद्धाच्या सम्यक आजिविका या तत्वाचे त्यांनी तंतोतन पालन केले.
आनंदाचे डोही आनंद तरंग।
आनंदाचे अंग आनंदाचे॥
काय सांगो झाले काहिचिया बाही॥
पुढे चाली नाही आवडीने॥
निर्वाणाच्या स्थितीचे वर्णन करताना तुकारामांना
शब्द सुचत नाहीत. आता कशातच आवड, रस, गुंतुन राहीले नाही असे ते जाहीर करतात.
निर्वाणानंतर निर्वाणाच्या आनंदात न डुंबता
बुद्धाप्रमाणेच तुकाराम माणसांच्या महासागरात परिवर्तनासाठी क्रांतीची मशाल घेऊन
संघर्षासाठी उतरतात. अखंड आयुष्य बहुजन हिताय बहुजन सुखाय चे अभिअयान चालवितात.
वेदांचा अर्थ केवळ आपल्यालाच कळला आहे. बाकीचे
केवळ शब्दांचा भारच वाहतात असे ते जाहिर करतात.
भलेतर देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माथी हाणू
काठी।
गरजवंताना, दलित, पिडीतांना शोषितांना ढुंगणाचेही
काढून देऊ, त्यांच्यासाठी सर्वस्व बहाल करु. परंतु नाठाळ शोषकांना चांगलेच ठोकून
काढू अशी रोखठोक भुमिका ते घेतात. तुकाराम हा ब्राह्मणी परंपरेने वर्ण
केल्याप्रमाणे बावळट, नेभळट, अव्यवहारी असा नसून तो सामाजिक समतेसाठी
शोषकांविरुद्ध शोषणकारी व्यवस्थेविरुद्ध संघर्षास निघालेला कृतिशील क्रांतीकारक
आहे.
दया तीचे नांव। पालन जीवांचे॥
आणि निर्दालन कंटकांचे।
या शब्दांत बुद्ध प्रणित अहिंसेचा, करुणेचा ते
उदघोष करतात. सर्व जीवांचे पालन् करणे ही महाकारुणा ते मान्य करतात. मात्र
कंटकाचे, शोषणाचे, शोषणकर्त्याचे आणि शोषणकारी व्यवस्थेचे निर्दालन केले नाही. तर
खर्या अर्थाने अहिंसा रुजत नाही व करुणेला अर्थ उरत नाही अशी भुमिका तुकाराम
घेतात आणि आपले नाते थेट बुद्धाशी जोडतात.
आपण कुणबी म्हणून जन्माला आलो यासाठी देवाचे ते
आभार मानतात. डॉ.आ.ह.साळुंखेनी याचे फार चांगले विवेचन केले आहे. ब्राह्मण म्हणून
जन्माला आल्यानंतर थोडीबहूत पुस्तकी
विद्या मिळते आपण कुणीतरी श्रेष्ठ आहोत याचा गर्व ब्राह्मणाला असतो. या गर्वामुळेच
माणूस संताच्या सेवेला म्हणजेच सदगुणी माणसांच्या सहवासाला मुकतो. त्यामुळे त्याला
खरेखुरे माणूसपण लाभू शकत नाही. ही विनाकारण झालेली नागवण होय. नागवण हा मार्मिक
शब्द तुकाराम वापरतात. माणसाला अत्युच्च शिखरावर घेऊन जाणारे सदगुण हे माणसाच्या
दृष्टीने वस्त्रासारखेच असतात. ब्राह्मण्याचा अहंकार विद्येची घमेंड इत्यादींमुळे
जणूकाही माणसाचे हे वस्त्रच हिरावले जाते. माणसाला नग्न बनविण्याचा ब्राम्हण्याची
आपल्याला अजिबात अभिलाषा नाही. कुणबी म्हणून जन्माला आलो. ही फार चांगली गोष्ट
झाली. नाहीतर दंभानेच मेलो असतो आणि निर्वाण प्राप्तीपासून दूर राहिलो असतो असे
तुकारामांना वाटते.
तुकाराम म्हणतात, स्पर्शाने नव्हे तर संकुचित
विचारांनी विटाळ होतो. परद्रव्य व परनारी यांच्याशी संपर्क करणे हाच खरा विटाळ.
मनातील विचार व वासना यांचा त्याग न कराआता केवळ मुंडन करुन काय उपयोग? यज्ञयाग
करणारे श्रोतिय ऋत्विज पुण्याची विक्री करुण दक्षिणा मिळवितात. पण प्रत्यक्षात ते
मातृगमणासारखे पाप आहे. भाड खाण्यासारखे हे धन म्हणजे विटाळ होय. जीवंतपणी
भुकेलेल्या माणसाला अन्न देत नाही मात्र मेल्यावर पींडदान देतात. ही तर फसवाफसवी
आहे. नवसाने मुले होतील तर मग नवरा करण्याची गरज काय? असा प्रश्नही ते विचारतात.
आम्हाला वनात जाण्याचे कारण नाही, जनातच विजनाचा
आम्हाला अनुभव येतो असे सांगत तुकाराम आपले नाते थेट बुद्धाशी सांगतात.
दुसर्या बाजूला बाह्मणी संतांनी समतेला
स्पष्टपणे नकार दिला आहे. तुकारामांवर
टिकाही केली होती. रामदास म्हणातात,
नीच प्राणी गुरुत्व पावला।
तेथे आचारचि बुडाला।
वेद शास्त्र ब्राह्मणाला। कोण पुसे?
तुकाराम शुद्र वर्गातील असूनही श्रेष्ठत्वाला
पोहोचले. जगदगुरु झाले त्यामुळे ब्राह्मणी संस्कृती बुडाली. वेद्शास्त्र जाणणार्या
ब्राह्मणाला आता कोणी विचारीत नाही अशी तक्रार रामदासांनी केली आहे.
अंत्यज शब्द ज्ञाता बरवा।
परी तो नेऊन काय करावा?
ब्राह्मण सान्निध्य पुजावा।
हे तो न घडे कि।
अंत्यज म्हणजे अस्पृश्य शब्द फार प्रचलित झाला
आहे. अस्पृश्यही प्रगती साधत आहेत. पण म्हणून त्यांना काय डोक्यावर घ्यायचे आहे? ब्राह्मणाच्या
बरोबरीने त्यांना वागवता येणार नाही असे रामदास म्हणत आहेत.
अंत्यज एक तो खरे। परि सांगाते घेऊ नये ती
महारे॥
पंडीत आणि चाटे पोरे। एक कैसी?
मनुष्य आणि गधडे। राजहंस आणि कोंबडे॥
राजे आणि माकडे। एक कैसी?
भागिरथीचे जळ आप। मोरी संवदिणी तो ही आप
कुश्चिळ उदक अल्प। सोसवेना॥
आत्मा एक असला तरी ब्राह्मण आणि शुद्रातिशुद्र
एक होऊ शकत नाहीत. ब्राह्मण श्रेष्ठ व इतर सर्वांना गाढव, माकड, कोंबड्या, चावट,
गटाराचे पाणी इ. उपमा देऊन रामदासांनी हिणवले आहे. अशाप्रकारे ब्राह्मणी
संस्कृतीच्या हट्टापायी ब्राह्मणांना श्रेष्ठ व इतरांना नीच म्हणून समतेला नकार
दिला आहे.
याउलट संत सेना महाराजांनी तेराव्या शतकातच
ब्राह्मणांविरुद्ध युद्ध पुकारले.
व्यर्थ कासायसि नावे। उगे चि धोकुनि मरावे ॥1॥
एक विठठलावाचुन। आणिक ना बा साधना॥2॥
वेदशास्त्र जाणितले। व्यर्थ अभिमानाने मेले ॥3॥
झाली पुराण उत्पती। मग अभिमानाने फुंदतीए।।4॥
ऎसे व्याधिचि शिणले। सेना म्हणे वाया गेले ॥5॥
वेदशास्त्राच्या अह्ंगडाने काहीजण फुकट मरतात तर
काही गर्वाने फुगतात. अशा रोगांनी जर्जर झाले आणि ते वाया गेले असे सेना महाराज
येथे म्हणतात.
चोरी करुनिया बांधले वाडे। झाले ते उघडे नांदत
नाही ॥1॥
वेश्या होऊनिया मिळविले धन। असता अवगुण लया गेले
॥2॥
मदिरा जुगार करी परद्वार। दारिद्र्य बेजार दु:ख
भोगी॥3॥
सेना म्हणे त्रासून फिरतो हो जनी। मग चक्रपाणी
भजू पाहे ॥4॥

ज्ञानेश्वरांनी आपले अखंड आयुष्य स्वत:ला
ब्राह्मण म्हणून स्वीकारले जावे यासाठी खर्ची घातले. विठठल कुलकर्ण्याला बहिष्कृत
केल्यामुळे आपल्यावरील हा बहिष्कार उठविला जावा व पुन्हा आपल्याला ब्राह्मण मानले
जावे, ब्राह्मण जातीत घ्यावे यासाठी ज्ञानियाने आळंदि पैठण इत्यादी ठिकाणच्या
ब्राह्मण श्रेष्ठांना व ब्राह्मणसभांना साकडे घातले. ती लढाई शेवटी त्यांना जिंकता
आली नाही. जन्मजात ब्राह्मण्याला त्यांनी श्रेष्ठ मानले. ब्राह्मणी संतानी
ब्राह्मण्य टिकवण्यासाठी कार्य केले. संत सेनापासून तर संत तुकारामापर्यंत बहुजन
संतांनी बुद्धप्रणित समतेसाठी संघर्ष केला.
विठ्ठल हा बुद्धच आहे असे बाबासाहेब
म्हणतात.बुद्धाचे ब्राह्मणीकरण करुन पंढरपुरचे बौद्धस्थळ सुद्धा ब्राह्मण
बडव्यांनी हाती घेतले. परंतु जाणिवेतून किंवा नेणिवेतून पंढरपुर बौद्ध स्थळाला भेट
देण्याची पूर्वापार पद्धत महाराष्ट्रातील बहुजन संतांनी आणि वारकर्यांनी चालू ठेवली
ती आजतागायत सुरु आहे. हे खरे असले तरी वारकरी पंथामध्ये जातीयता, धर्मांधता,
अंधश्रद्धा, रुढीप्रियता या घात गोष्टींनी पुन्हा ठाण मांडले आहे. व्यक्ती व
समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक अशा सर्वांगिण शोषणाविरुद्ध
संघर्ष करुन व्यक्तीची प्रतिष्ठा आणि समाज व राष्ट्राचे ऎक्य व एकात्मता यांच्या
प्रस्थापनेसाठी पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाला युद्ध पुकारावे लागेल. तरच संत
तुकाराम महाराजांना खरे अभिवादन केल्याची व आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अनुभूती
अनुभवता येईल.
------ प्रा. प्रेमरत्न चौकेकर
------ प्रा. प्रेमरत्न चौकेकर
Labels:
Ambedkar,
BSP,
Buddha,
Dynaneshwar,
Jaibhim,
Republican,
Tukaram,
आंबेडकर,
ज्ञानेश्वर,
तुकाराम,
संत,
सेना
Friday, June 29, 2012
ईडा पिडा टळो भिमाचे राज्य येवो!
नेहमीप्रमाणेच या
दिवाळीला सुद्धा मोबाईलवर मित्रांचे मेसेजेस आले. काही हिंदु मित्रांनी दिवाळीच्या
शुभेच्छा दिल्या होत्या. काही ज्येष्ठ विचारवंतांच्या शुभेच्छा आल्या. काहींनी
दिवाळीच्या ऎवजी इडा पिडा टळे बळीचे राज्य येवओ अशा शुभेच्छा दिल्या होत्या. काही
बौद्ध मित्रांनी दिवाळी हा मोदगल्यायन या बौद्ध भिक्खुचा याच दिवशी खून झाला होता
म्हणून हा दिवस आनंदाचा नसून शोक दिन आहे असेही मेसेज पाठवले.
त्या सर्व मेसेज
मधून माझे मन ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो!’ या मेसेज वरुन हटत हटेना डोक्यात
बराच कोलाहलमाजला आणि विचारांची एक श्रुंखला निर्माण होत गेली. बळीचे काय करायचे
असा प्रश्न समोर उभा ठाकला!
1937 सालचा प्रसंग!
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विलायतेहून नुकतेच आगमण झाले होते. त्यांनी आपल्या
स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौर्याचा कार्यक्रम निश्चित केला. आपल्या पहील्या फेरीत
नाशिक जिल्ह्यातून दौरा करण्याचे निश्चित झाले. बाबासाहेबांचे आगमण जिथे तिथे असे
तेथे तेथे पुढील घोषणा दिल्या जात होत्या, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जयजयकार”, आंबेडकर कौन है! दलितोंका राजा है।“ “तरुण पार्टी झिंदाबाद। थोडे दिन मे भिमराज।“ सर्वच ठिकाणी स्वतंत्र मजूर पक्ष व
डॉ.बाबासाहेब यांचा जयजयकार होत होता.
दिंडोरी येथे
आल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जयजयकाराने दिंडोरी गाव गजबजून गेले.
महारवाड्यात सुंदरशा मंडपात तयार केलेल्या मंचावर आरुढ होताच तेथील शेकडो
स्त्रीयांनी आरती ओवाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना भक्तीभावाने व भगिनीप्रमाणे
ओवाळून ‘इडा-पिडा टळो! भिमाचे राज्य येवो!’ असे म्हणाल्या.

पहीली गोष्ट “भिमराज येवो” या घोषणेतून व्यक्त झाली आहे. डॉ.आंबेडकरांना
सार्वजनिक आयुष्यात येऊन केवळ 10 वर्षे झाली होती. त्यातही राजकारणात फारच थोडी.
तरीही 1927ला महाडच्या चवदार तळ्यावर सुरु केलेला सामाजिक समतेचा संघर्ष दलितांना
विशेषत: महारांना जबरदस्त चैतन्य देऊन गेला. बाबासाहेबांनी मानवी हक्कांची सुरु
केलेली लढाई महारांनी शिरसंवाद्य मानली व चळवळीसाठी तन मन धन सर्व काही दू केले.
त्यामुळेच बाबासाहेब या देशामध्ये समग्र क्रांती करु शकतात असा विश्वास
महारांमध्ये निर्माण झाला. त्या समग्र क्रांतीलाच त्या भोळ्या भाबड्या परंतु कट्टर
निष्ठावंतानी ‘भीमराज’ नाव दिले.
दुसरी गोष्ट त्या
शिलवान, निष्ठावान भगिनिंनी बाबासाहेबांना ओवाळताना ‘ईडा पिडा टळो! भिमाचे राज्य
येवो!’ असे म्हंटले. त्या भगिनिंना त्या काळामध्ये म्हणजे 1937 मध्ये बळीचे राज्य
येवो असे न म्हणता ‘भिमाचे राज्य येवो’ असा काळानुरुप बदल केला. केवढी मोठी
निष्ठा! केवढे मोठे शहाणपण! केवढा मोठा विश्वास! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या
विद्ववत्तेवर, शीलावर, करुणेवर ज्यांची जीवापाड निष्ठा होती त्यांनी बळीला 1937
सालीच सोडले व बाबासाहेबांना तन-मन-धनाने स्वीकारले. ज्यांनी बाबासाहेबांच्या
विचारविश्वाचा, आधुनिक भारताचा ध्यास घेतला, ज्यांनी नव्या राष्ट्राच्या
निर्मितीचा ध्यास घेतला, ज्यांनी नव्या राष्ट्राच्या निर्मितीचा ध्यास घेतला त्या
बाबासाहेबांच्या निष्ठावान अनुयायांनी 1937 सालीच बळीच्या राज्याला डॉ.बाबासाहेब
आंबेड्कर प्रणीत नवराष्ट्र निर्माण हाच पर्याय आहे हे छातीठोकपणे सांगितले.
कारण बळीच्या
राज्यात बहुजनांना सुखशांती असेलही. परंतु आता नव्या जमान्यात एकाधिकारशाही,
राजेशाही, सामंतशाही म्हणजेच शोषण! हे संपवायचे असेल तर लोकसत्ताक रचनाच हवी.
आम्हीच आमचे प्रवर्तक आम्हीच आमचे मालक!
शिवाय बळीने
वामनापुढे शरणागती पत्करली. वामनाला म्हणे तीन पाय होते. त्यातला एक पाय आकाशात,
दुसरा पाय पृथ्वीवर ठेवल्यानंतर तिसरा कुठे ठेवायचा हा प्रश्न पडला आणि बळीने आपली
मान तुकवून आपले डोके वामनाच्या तिसर्या पायासाठी पुढे केले. यातील ब्राह्मणी
कल्पनाविलास सोडला तर एक सत्य उरते! ते म्हणजे ब्राह्मणाच्या वेषात आलेल्या
वामनाला बळी सर्वश्रेष्ठ मानतो. ब्राह्मणी व्यवस्थेला व ब्राह्मणी धर्माला
शिरसंवाद्य माननारा बळी म्हणूनच वामनापुढे मान तुकवतो. हि शरणगमनता अचानक आलेली
नाही. ब्राह्मणी संस्कृतीच्या प्रभावाखाली असल्यामुळेच बळी वामनला डोक्यावर घेतो
आणि अखंड भारतवर्षाला व समस्त बहुजनांना ब्राह्मणाच्या हवाली करुन एका अंधारयुगाला
प्रारंभ करतो. बहुजनांच्या कित्येक पिढ्यांनी रक्ताने, घामाने उभारलेले एक सुजलाम,
सुफलाम राज्य आपल्या एका कृतीने एका क्षणांत बळीने ब्राह्मणाच्या हाती नव्हे तर
पायी देऊ केले. हा भाबडेपणा म्हणावा की आणखी काही?
हे आजच्या
विचारवंताना दिसत नाही असे नाही. तरीही ते ‘बळी बळी’ म्हणून टाहो फोडत आहेत. हे
त्यांच्या अज्ञानातून घडत नसून हिंदुत्वाचे भिकार सनात तुणतुणे ज्यांना सोडवत नाही
व आधुनिक राष्ट्र निर्मितीचा बाबासाहेबांचा आराखडा ज्यांना पचत नाही अशांनी बळीचे
भूत बळेबळेच गळी मारुन बहुजनांना आंबेडकरी विचारधारेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र
खुद्द डॉ.बाबासाहेबांच्या नावाचा जप करत
सुरु ठेवले आहे. आंबेडकरी विचारमंथनातून स्वत: ही मुक्ती पावत नाहीत व बहुजनांनाही
मुक्तीपासून दुरु ठेऊन त्यांच्या मनात गोंधळ उडवून देत असतात. हा सुनियोजित कट आहे
असे आम्हांस वाटते.
आधुनिक भारताच्या
रचनेचा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आराखडा संविधान समितीने व संसदेनेही
स्वीकारला नाही. बाबासाहेबांनी प्रस्तुत केलेले मनुला संपविणारे व भारतीय
स्त्रिचाही सन्मान वाढविणारे ‘हिंदु कोडबिल’ नेहरु व इतर सनतन्यांनी मान्य तर केले
नाहीच उलट गायब केले आणि त्यापूर्वी संविधानामध्ये समग्र क्रांतीचे रसायन ओतायला
याच सनातन्यांनी बाबासाहेबांना संविधानसभेमध्ये विरोध केला होता. शेवटी हेच
क्रांतीचे रसायन ‘States &
Minorities’ या नावाने स्वतंत्र ग्रंथाच्या
रुपात बाबासाहेबांनी प्रकाशित केले आणि अशा क्रांतीकारी विचारधारेकडे पाठ फिरवून
जे जे ‘बळी बळी’ असा जप करित आहेत त्या बळींच्या ध्यासाध्यायींना आम्ही शुभेच्छा
तरी कशा द्यायच्या हा आमच्यासमोर प्रश्न उभा राहतो. अज्ञानात खितपत पडलेल्या व
म्हणूनच त्यांचे जीवन नरकयातनांनी परिपूर्ण आहे अशा बहुजनांना समग्र क्रांतीचा मार्ग
दाखविण्याऎवजी पुराणातल्या ब्राह्मणी व्यवस्थेला शरण जाणार्या बळीचे स्वप्न
दाखवून किती दिवस हे ब्राह्मणग्रस्त छुपे हिंदुत्ववादी विचारवंत फसविणार आहेत?
याप्रसंगी ‘शुद्र पूर्वी
कोण होते’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत बाबासाहेबांनी उल्लेख केलेल्या हिंदुच्या पाच
प्रकारच्या वर्गांची आठवण होते. पुष्कळ वर्षे आम्ही ज्यांना पुरोगामी समजलो ते
तथाकथित विचारवंत असे फुसकेच राहतील असे वाटले नव्हते.
शेवटी “ईडा पिडा टळो” या बहुजनांच्या सार्वजनिक शुभसंदेशाकडे वळुयात!
“ईडा” या शब्दाचा अर्थ मराठी भाषेमध्ये सापडत नाही. ‘ईडा’
हा द्राविडी शब्दप्रयोग आहे. आजही तो तामिळ भाषेत प्रचलित आहे. ईडा चे तामिळ भाषेत
दोन अर्थ आहे. एक म्हणजे ‘घास’! अन्नग्रहण करताना अन्नाचा एक अंश जो आपण तोंडात
घालतो तो घास म्हणजे ईडा. म्हणजे ईडा हा अन्नासंबधी अन्नदर्शक शब्द आहे.
ईडा या शब्दाचा
दुसरा अर्थ आहे हिरवागार भुप्रदेश. म्हणजे सुपिकता, सुजलाम, सुफलाम अशा अर्थाचा
भावदर्शक शब्द आहे. तो कृषिप्रधानताही दर्शवतो. ‘पीडा’ म्हणजे दु:ख, यातना! ‘पिडा’ला
पाली भाषेमध्ये पीळा म्हणतात. जसे पीडा व पीळा एकच होतात तद्वतच ईडेचा ईळा होत
असावे.
ईडा पीडा हे
शब्दप्रयोग द्राविडांचे द्रविडीभाषेचे दक्षिनायन झालेल्यानांही किंवा उत्तर
भारतातून अनेक परकीय राजसत्तांच्या आक्रमणामुळे द्राविडींचे उच्चाटन झाल्यानंतरही
महाराष्ट्रामध्ये द्राविडीचा थोडाफार अवषेश अजुनही बाकी आहे.
‘ईडा पीडा टळो’ याचा
अर्थ अन्न देणार्या हिरव्यागार भुप्रदेशावर येत असलेली पीडा नष्ट होवो. मुबलक
अन्न मिळो अन्न धान्य पिको सुख समृद्धी येवो व सर्व सुखी होवोत असा होतो. आधुनिक
भारतामध्ये ही समृद्धी येऊन देश खर्या अर्थाने जागतिक महासत्ता बनायचा असेल तर संविधानाने
पुरस्कृत केलेल्या जीवन मुल्यांचा स्वीकार प्रत्येक भारतीयाला करावाच लागेल.
संविधान पुरस्कृत
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व हिच अस्मिता व्हायला हवी. मराठी, बिहारी, तमिळ,
भैया, काश्मिरी, बोडो अशा फुटकळ अस्मिता कामाच्या नाहीत. त्याकाही जणांना काहीकाळ
सत्तासुख देतील पण हाती सत्ता असताना आंबेडकरी आराखड्याप्रमाणे देशाच्या किंवा
राज्याचा विकास घडवून आणला नाही तर बहुजन कल्याणकारी राज्याची सुतराम शक्यता नाही.
उलट अशा छद्मी अस्मितेमुळे माणसामाणसातून दरी रुंदावली जाते. शेवटी कधी प्रांताच्या नावाने तर कधी भाषेच्या
पोकळ अभिमानाने दंगली घडविल्या जातात. दंगली, विध्वंस यांच्या अराजकातून काही
व्यक्तींचे भवितव्य जरुर घडेल परंतु देशाचे भवितव्य मात्र जेव्हा अशा खुजा
लोकांच्या हाती सत्ता जाते त्याची किंमत शांततापुर्ण विकासाची वाट पाहत असलेल्या
लोकांना मोजावी लागते.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर ठणकावून सांगतात, ‘मी प्रथमही भारतीय आहे आणि नंतरही भारतीयच आहे’. अशा
प्रकारची उत्तुंग मानसिकता प्रत्येक भारतीयाच्या अंगात कोरली जाईल त्यादिवशी देश
खर्या अर्थाने नवनिर्माणाच्या मार्गाने कुच करील. जातीविरहीत व वर्गविरहीत
समाजाची रचना करणे हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संकल्प आहे. संसदिय लोकशाही
बाबासाहेबांना सर्वात योग्य वाटते. व्यक्ती, समाज व राष्ट्र यांचा एकसंघ विकास या
दृष्टीने त्यांनी संविधान दिले व विचारधारा मांडली. खरे तर बाबासाहेबांचा या
विचारधारेला आणि सम्यक संकल्पाला नाकारायची कुणालाच कसल्याही प्रकारची गरज वाटू
नये परंतु जेव्हा बहुजन विचारवंत ही आंबेडकर नावाच्या क्रांतीला नकार देतात तेव्हा
नाकारणार्यांच्या बाबत शंका उपस्थित होणे साहजिकच होय. ‘बळी’ व ‘वामन’ हि मोठी
समस्या नाही परंतु त्यांच्यात अडकलेली मानसिकता हिच मोठी धोंड होय.
--- प्रा. प्रेमरत्न चौकेकर
--- प्रा. प्रेमरत्न चौकेकर
Tuesday, June 19, 2012
नरके यांनी आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी!
महार कोण होते?
उदगम: संक्रमण: झेप या नावाचे पुस्तक संजय सोनवणी यांनी बाजारात आणले आहे. या
पुस्तकाच्या खपासाठी प्रमोशन प्रोग्राम घेतले जात आहेत. या कार्यक्रमाचे प्रायोजक
समाज शिक्षण अभियान ही पावसाळी छत्री करत आहे. या संस्थेचे सर्वेसर्वा शुद्धोधन
आहेर, प्रा. विजय मोहिते ईत्यादी आहेत.
नरके यांनी आंबेडकर
भवन येथे आपल्या भाषणात आरोप केला की, आंबेडकरवादी हे मराठ्यांना आरक्षण मिळवून
देण्यासाठी सुपार्या घेत आहेत. या गंभीर आरोपाबाबत या अविवेकी वाचाळ माणसाने
आपल्या या मुर्खपणाबद्दल आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागायला हवी. त्यांनी कुणावर
व्यक्तीगत आरोप केला असता तर गोष्ट वेगळी होती. पण सरसकट सर्व आंबेडकरवाद्यांना
त्यांनी आरोपीच्या पिंजर्यात उभे केले हा कोणता शहाणपणा? यामुळेच त्यांनी या
प्रकरणी जाहीर माफी मागावी अशी समस्त आंबेडकरवाद्यांची मागणी आहे.
वाशी येथील दैवज्ञ
भवनात झालेल्या प्रमोशनल कार्यक्रमामध्ये तर नरके नरक ओकले. नरकेंच्या भाषणाच्या
सुरुवातीलाच एका बौद्ध बांधवाने महार कोण होते? असे या पुस्तकाचे नाव का ठेवले?
पुन्हा पुन्हा महार या शब्दाचा वापर का करता? महार आणि बौद्ध हा वाद निर्माण का
करता? वगैरे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. परंतु नरके यांनी त्यांना सज्जड दम
भरत त्यांना खाली बसायला लावले. त्यावर
बोलताना नरके म्हणाले, हे पुस्तक बौद्धांसाठी लिहीलेले नाही आणि मंचावरील कंपुने
टाळ्या वाजवल्या. खरे तर लेखक संजय सोनवणी यांनी आपल्या पुस्तकात हे पुस्तक
बौद्धांसाठी नाही असे कुठेही म्हंटलेले नाही. उलट एकूनच पुस्तक वाचल्यानंतर असे
स्पष्ट जाणवते की हे पुस्तक केवळ बौद्धांसाठीच लिहिले आहे. आज हे जाहीर आहे की
गेली 50 वर्षांपासून तरी बौद्ध समाजच परिवर्तनकारी पुस्तके वाचतो आणि खरेदी करतो.
त्यामुळे ज्याला आपल्या पुस्तकाचा खर्च भरुन काढायचा असतो आणि वर कमाई करायची असते
त्याने खुशाल बौद्धांमध्ये पुस्तके आणून वितरीत करावीत ह निश्चित झालेले आहे.
या पुस्तक रुपाने
आंबेडकरी समाजात महार व बौद्ध अशी दुही माजविणे हा या पुस्तकाचा, नरके व त्यांच्या
कंपुचा छुपा अजेंडा दिसुन येतो. असा हिणकस प्रयत्न या आधीही झाला होता. शिवसेना प्रमुख
बाळ ठाकरे यांनी बौद्धेतर दलितांना हिंदु दलित असे म्हणून त्यांचा वेगळा मेळावाही
लावला होता चर्मकार, मातंग ढोर, ईत्यादी उमेदवारांना निवडणूकांमध्ये तिकीटे देऊन
निवडूनही आणलेले आहे. बौद्धांपासून इतर दलितांना तोडण्यासाठी सर्वच प्रस्थापित
वेगवेगळ्या प्रयुक्त्या वापरीत असतात. त्यात आता नरके आणि कंपुची भर पडली आहे.
आंबेडकरवाद्यांवर सुपारीचा आरोप करणार्या या कंपुने स्वत: कुणाची सुपारी घेतली
आहे की काय असे वाटण्या इतपत त्यांचे वर्तन बेताल होत आहे.
त्यानिमित्ताने एक
गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, ओबीसींच्या आरक्षणाविषयी पूर्वाश्रमीच्या महारांना
रस्त्यावर उतरविण्यासाठी नरके खटाटोप करीत आहेत. मराठा सेवा संघाचे व शिवधर्माचे
पुरषोत्तम खेडेकर यांच्यावर टीका करताना खेडेकरांच्या एका पुस्तकातील ब्राह्मण स्त्रीयाविषयी
अतिशय नीचांक गाठणारे लेखक वाचून दाखवितात. खेडेकरांनी आपल्या पत्नीला बीजेपीच्या
तिकीटावर निवडणूक लढवून आमदार केले. मराठा हे सर्व सत्ता गिळंकृत करीत आहेत. मराठे
ओपन सीट मधून निवडून येतातच. परंतु त्यांची भुक आणखी वाढली आहे. त्यामुळे
ओबीसीच्या जातप्रमाणपत्रावर आता ओबीसी कोट्यातूनही ते निवडणूका लढवितात. इतर सवलती
लाटत आहेत. आणि अशा मराठ्यांना बामसेफचे वामन मेश्राम मदत करीत आहेत, सुपार्या
घेत आहेत असे गंभीर आरोप नरके यांनी केले. अर्थात या आरोपांचे उत्तर खेडेकर आणि
मेश्राम देतीलच!
आपली भाषणबाजी पुढे
रेटताना नरके पुढे म्हणतात, तुम्ही बौद्ध लोक 1 जानेवारीला भीमा कोरेगांवला का
जाता? तुमची नक्की अस्मिता कुठली? महार की बौद्? तुमचा काय संबंध? असे विचारुन ते
पुढे असेही म्हणतात कि, महारांनी भीमा कोरेगांवचा लढा लढून पेशवाईचा अंत केला
असला, त्याप्रसंगी नेतृत्व जरी केले असले व बहुसंख्येने महार असले तरी एखादा माळी,
एखादा चर्मकार, मातंग, कुणबी इत्यादि जातीतील सैनिकही प्राण पणाला लावून लढले
त्यांचा विसर पडता कामा नये.
इथे एक मुद्दा
लक्षात घ्यायला हवा की, पुर्वाश्रमीचे महार आजचे बौद्ध केवळ महार योद्धांना सलामी
द्यायला जातात असा नरकेंचा समज असावा. एवढ्या कोत्या बुद्धीचे बौद्धजन नाहीत हे
नरकेंना भांडारकर इंस्टीट्युटमध्ये बसून पोथ्यापुराणात सापडणार नाही. हे
कळण्यासाठी अर्थातच सच्चा दिलाने बौद्धमय व्हायला लागेल.
आम्ही या प्रसंगी
असे विचारतो की तुम्हाला आणि एकुणच पुर्वाश्रमीच्या महारांना सोडून इतर समाजाला
भीमा कोरेगांव येथे जायला कोणी प्रतिबंध केला आहे? आता तरी तेथे जा! लाखो
कोटींच्या संख्येने जा. आणि ब्राह्मणीधर्म संपविण्याच्या जिद्दीने धारातिर्थी
पडलेल्या तुमच्या पुर्वजाची जाऊन तेथे माफी मागा आणि म्हणा की, आम्ही नालायक आहोत
तुम्हाला गेली शंभर वर्षे ओळखु शकलो नाही. तुमच्या शौर्यासमोर नतमस्तक झालो नाही
याची आम्हाला लाज वाटते आहे. अशा प्रकारे नरकेंनी भीमा कोरेगांवला जाऊन एकदा तरी
मनापासून गुढगे टेकले तरी ते धन्य होतील.
ओबीसींच्या
आरक्षणाबाबत ओबीसी स्वत: संवेदनशील नाहीत आणि गंभीर ही नाहीत. परंतु आंबेडकरवादि
पूर्णत: ग्ंभीर आहेत. आज ओबीसी ब्राह्मणी गुलामगिरीच्या कच्याट्यात पूर्णत: अडकला
आहे. धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजईय संपुर्णपणे तो ब्राह्मणी तंबूतच आहे.
याची कल्पना आंबेडकरवाद्यांना आहे. म्हणूणच त्यांच्या रक्षाणी आणि आरक्षणाची
जबाबदारी आंबेडकरी समाज घेत आहेत. सातत्याने ब्राह्मणी व्यवस्थेच्या समर्थकांसोबत
राहून दलितांवर अत्याचार करण्यामागे ओबीसी पुढे असूनही बुद्धाच्या करुणेने, समता
भावनेने, मैत्री भावनेने ओबीसींसाठी आंबेडकरी समाज प्रयत्नशील आहे. बौद्धांनी 55
वर्षात काय केले या प्रश्नाचे उत्तर अर्थातच भांडारकर इंस्टीट्युटच्या पोथ्या
पुराणातून मिळणार नाही.
मराठ्यांच्या
आरक्षणाविरोधात नरके गळा काढत आहेत. मंडल आयोगाअंतर्गत हिमाचल प्रदेश व हरियाणा या
दोन राज्यात ब्राह्मणांना ओबीसी म्हणून आरक्षण मिळाले. तेव्हा नरकेंना वाईट वाटले
नाही. परंतु आज मराठा समाज आरक्षण मागत आहे तर त्याविरुद्ध नरके बरळत आहेत. याबाबत
मागासवर्गीय कोण हे ठरविण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जावा व त्या त्या वेळी जे
मागास असतील त्यांच्या उत्थानासाठी शासनाने योग्य धोरण आखावे व उपाय योजावेत असे
संविधान म्हणते.
त्यामताशी
आंबेडकरवादी पुर्ण सहमत आहेत. त्याला विरोध असण्याचे कारण काय? आरक्षण हे
मागासांच्या उत्थानासाठी एक सांविधानिक साधन आहे हे खरे आहे. परंतु 52% असलेल्या
ओबीसीना आपल्या उत्थानासाठी कुणाची गरज नाही. मात्र स्वत:ला गुलाम करणार्या
व्यवस्थेशी जो पर्यंत दोन हात करायची तयारी नाही तोपर्यंत ओबीसींची मुक्ती वा
स्वातंत्र्य शक्य नाही. आता नरके आणि तत्सम विद्द्वान जर खरेच गंभीर असतील तर
ओबीसी समाजाला जागृत करायचे काम पूर्ण ताकदीनीशी करावे. तरच या देशाचे भवितव्य
बदलेल. ओबीसीच्या वैचारीक, सास्कृत्तीक सामाजिक, धार्मिक, राजकीय प्रबोधनाशिवाय व
संघर्षाशिवाय देशाचे राष्ट्रीयत्व सुरक्षित राहणार नाही. एवढी प्रचंड जबाबदारी
नरकेसारख्या लोकांवर आहे. महार कोण होते हे महारांना सांगुन काहीच फरक पडणार नाही.
सोनवणींच्या पुस्तकात महार रक्षक होते असे म्हंटले आहे. डो. बाबासाहेब आंबेडकरांनी
महार हे राज्यकर्ते होते हे सिद्ध केले आहे. तरीही संजय सोनवणींचा खोडसाळपणा
आंबेड्करी समाजाच्या डोक्यावर मारण्यात नरकेंना विकृत आनंद मिळाला तरी ओबीसीच्या
स्वातंत्र्यलढ्याची जबाबदारी ते स्वत:, सोनवणी व इतर ओबीसी अभ्यासक टाळू शकत नाही.
लेखक संजय सोनवणी म्हणतात तसे बाबासाहेबांना कुणीही जातीमध्ये बंद केलेले नाही.
आंबेडकरी विचारधारा बंदिस्त केलेली नाही. संजय सोनवणी त्यांच्या पुस्तकाच्या
प्रस्तावनेत म्हणतात, नरके हे डॉ. आंबेडकरांवरील एकमेव ऑथॅरीटी आहेत. मग रडता
कशाला? व्हा सज्ज! जा ओबीसींमध्ये! सांगा त्यांना आंबेडकरवाद म्हणजे काय? ठरवा
रणनिती! करा जागृती! हिंम्मत असेल तर करुन दाखवा! परंतु आंबेडकरवाद्यांना दोष देणे
बंद करा, नाहीतर तुमचे दात तुमच्या घशात घालण्यास आंबेडकरवादि तयार आहेतच.
(ओबीसींचे प्रबोधन तरी पैसे न घेता करा ही नम्र विनंती)
रिपब्लिकन जनता (मार्च-2012) मासिकातून साभार!
रिपब्लिकन जनता (मार्च-2012) मासिकातून साभार!
Monday, March 19, 2012
मी रिपब्लिकन का आहे? भाग-3

आजच्या परिस्थितीचा आढावा बाबासाहेबांच्या लोकशाहीच्या संदर्भानिमित्त विचारधारेच्या पार्श्वभुमीवर घेतला असता आपणांस काय दिसते? याबाबत थोडीशी चर्चा येथे करायला हवी.
- समाजात विषमता आहे :- भारतीय समाजात दोन प्रकारच्या विषमता आढळतात. सामाजिक व आर्थिक.
अ) सामाजिक विषमता
संविधानाच्या अनुच्छेद क्र. 14 नुसार सर्व व्यक्ती कायद्यापुढे समान आहेत. अनुच्छेद क्र. 15 नुसार धर्म, जात, पंथ,प्रांत, लींग या आधारे दोन व्यक्तींमध्ये भेदाभेद करता येणार नाही. अनुच्छेद क्र. 17 नुसार जातीभेद नष्ट केला गेला आहे.
संविधान स्विकारुन आज 60 वर्षे होऊन गेल्यानंतरही या देशामध्ये निरनिराळ्या आधारांवर माणसामाणसांमध्ये भेदाभेद केला जातो. धर्माच्या नावावर केवळ भेदाभेदच नव्हे तर दंगलीही होतात. बाबरी मशिद पाडली जाते. राममंदिराचे अभियान चालवले जाते. काश्मीरमधून हिंदुना हाकलले जाते. दिल्लीमध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर शीखांची कत्तल केली जाते. सर्वधर्मसमभावाच्या नावाने सकाळ संध्याकाळ भजन करणारे लोक अचानक धर्माच्या नावावर दंगलखोर होतात. तेव्हा त्यांचा सर्वधर्मसमभाव किती बेगडी आहे हे सिद्ध होते.
देशभरातील लाखो गाव खेड्यांमधून आजही जात, जातियता, जातीभेद, जातीव्यवस्था पुर्वीसारखीच कायम आहे. संविधानप्रणित कायद्यानुसार जातीचा उच्चार करण्याचे कमी झाले असले तरी आचारधर्म फारसा बदललेला नाही. अनेकवेळा ही जात्यंधता उद्रेकाच्या रुपात बाहेर पडते आणि दलितांच्या वस्त्या शिकार होतात.
जात आजही भारतीय मानसिकतेच्या खोलवर जाऊन बसलेली आहे. त्याला शहरेही अपवाद नाहीत. शहरामधून ही भावना व्यक्त करण्याचे प्रकार बदलले असले तरी ती भावना अजून नष्ट झालेली नाही. जात आणि जातीव्यवस्था या विरुद्ध ना गांधी लढले ना गांधीचे वारसदार लढले; ना कॉंग्रेस लढली, ना कम्युनिस्ट ना समाजवादी लढले. भाजपासारखे संघीष्ट तर जात आणि जातीव्यवस्थेचे समर्थन करतात.
ब)आर्थिक विषमता
स्वातंत्र्योत्तर भारतात प्रगती जरुर झाली. देशाचा विकास झाला व होत आहे. परंतु विकासाची फळे नेमकी कुणाला मिळाली?
देशातील उद्योगधंदे प्रस्थापितांच्या हाती गेले. प्रस्थापित जात - वर्गाच्या हाती या देशातील आर्थिक सत्ता पूर्वीपासूनच होती. हाती असलेल्या प्रचंड संपत्तीची आधूनिक उत्पादन साधनांमध्ये व उत्पादन व्यवस्थेमध्ये त्यांनी गुंतवणूक केली. बाजार, मार्केटींग त्याच्या हाती पूर्वीपासूनच होती. त्यामुळे आधुनिक भारताची आर्थिक सत्ता सुद्धा त्यांच्याच हाती गेली. या निवडक लोकांच्या छोट्याश्या समुहाकडे देशातील भांडवल एकवटले गेले. बाकी उर्वरीत करोडो लोकांच्या हाती त्या प्रस्थापितांची सेवा करण्याचे काम पुन्हा एकदा आले. मनुस्मृती शुद्रा-अतिशुद्रांना वरिष्ठांची सेवा करण्याचा आदेश दिला. शुद्रातिशुद्रांच्या केवळ श्रमशक्तीवरच नव्हे तर त्यांच्या देह व मनावरही प्रस्थापिताचा हक्क होता. नवीन उत्पादन व्यवस्थेमध्ये शुद्रअतिशुद्रांवर पुन्हा एकदा ब्राह्मणी व्यवस्थेची पकड घट्ट झाली. संविधान प्रणित प्रतिष्ठेला पुन्हा एकदा डावलले गेले शुद्र अतिशुद्र म्हणजे केवळ श्रमशक्ती एवढाच अर्थ शिल्लक राहिला. प्रस्थापितांच्या तथाकथित लढाऊ संघटनांनी डाव्या लाल चळवळीच्या नावाखाली केवळ पैसे वाढवून द्यायचे लढे उभारले परंतु प्रतिष्ठा व सन्मान मिळवून दिला नाही.
आजही 50% पेक्षा जास्त लोक दारिद्र्य रेषेखाली जेवन जगत आहेत. त्यांच्या हाताला काम नाही, पोटाला अन्न नाही. त्यांची मुले भुकेने व कुपोषणाने मरत आहेत. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा हक्क दिला आहे. परंतु सत्ताधार्यांना त्याची चाड नाही. सत्तादारी पंचतारांकीत मेजवान्या झोडत आहेत.
कॉर्पोरेट सत्तेमधला एखादा अंबानी 27 मजली महाल बांधतो आणि या देशातल्या शुद्रातिशुद्रांच्या कॉर्पोरेट गुलामगिरीवर शिक्कामोर्तब करतो. जनहितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आणि त्यांचे शासन डोळ्यावर पट्या बांधून अर्थसत्तेच्या मालकांना हवे असलेले जी.आर. विनाविलंब काढीत राहतात.
हि परिस्थिती देशात लोकशाही व्यवस्था निर्माण करण्यामध्ये अडथळे निर्माण करीत आहे.
गाव म्हणजे गावगाडा, गावगाड्यातील जाती परस्परांबद्दल शत्रुत्व दाखविणार. प्रत्येक जातीच्या वेगवेगळ्या वस्त्या परस्परांशी सहकार्य मर्यादित करतात. एक जात म्हणजे जणू एक राष्ट्रच होय! एकसंघ समाज बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये जात हा मुख्य प्रतिरोध आहे.
आर्थिक प्रगती केलेल्या व वरच्या वर्गात गेलेल्या व्यक्तीना सुद्धा जातीच्या कक्षा तोडून दिल्या जात नाहित. कनिष्ठ समजल्या जाणार्या जातीतल्या श्रीमंत व्यक्तीना सुद्धा उच्च समजल्या जाणार्या जातींशी सहज व सुलभ सामाजिक व्यवहार करता येत नाहीत. सांस्कृतीक व धार्मिक व्यवहारांपासून तर त्याला कोसो दुर ठेवले जाते. आर्थिक अडथळ्यांपेक्षा सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक अडथळे जातीव्यवस्थेमध्ये माणसांना एकमेकांपासून दुर ठेवतात. त्यामुळे सामाजिक अभिसरणाची शक्यता अतिशय दुरापास्त होते. बंधुत्वाच्या अभावी लोकशाही प्रस्थापित होणे केवळ अशक्य आहे.
2) विरोधी पक्ष हिनदीन झाला आहे.
लोकशाहीमध्ये विरोधीपक्ष मजबूत असणे गरजेचे असते. सभागृहामध्ये सत्ताधारी पक्षावर जेथल्या तेथे व सात्यत्याने अंकुश ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी विरोधीप्क्ष सतर्क, जागृत व लोकशाहीवादि असणे आवश्यक असते. लोकांच्या समस्यांबद्दल त्याला जाणिव असायला हवी. राजकीय पक्षांमध्ये व्यक्तीपूजा असणे घातक आहे. त्याहीपेक्षा राजकीय पक्ष विशिष्ट जातीशी बांधला जाणे हे जास्त घातक असते. राजकीय पक्षाला धर्म, जात, पंथ, प्रांत भाषा यांचा अभिनिवेश नसावा. सध्याच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूकीसाठी लोक प्रतिनिधीत्व म्हणेज तिकीट देताना राजकीय पक्ष उमेदवारीच्या जातीचा प्रथम विचार करतो. हे भयंकर आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया ही जातीच्या जाणिवा तीव्र करणारी प्रक्रीया होऊन बसली आहे.
याचा दोष अर्थातच निवडणूक प्रक्रियेला नसून राजकीय पक्षांच्या प्रस्थापित जातीय नेतृत्वाला आणि जातीव्यवस्थेला आहे.
धर्मांध आणि जात्यांध नेतृत्व राष्ट्राच्या व समाजाच्या व्यापक हिताचा विचार न करता तात्पुरत्या जातीय फायद्यातोट्य़ाची गणिते मांडीत असतात. आपल्या जातीपेक्षा व धर्मापेक्षा दुसरी जात व धर्म वरचढ होणार नाही अशाप्रकारचे संकुचित डावपेच खेळण्यात राजकीय पक्षांची वर्षे निघून जातात.
धर्म हा लोकशाही प्रस्थापित होण्याच्या मार्गातील आणखी एक अडथळा होय. गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाबाबत भाजपच्या मोदी सरकारने घेतलेली भूमिका व शहाबानो प्रकरणी कॉंग्रेसने घेतलेली भूमिका ही धर्मांध संकुचिततेची दोन टोके आहेत.
महाराष्ट्रातील रमाबाई व खैरलांजी प्रकरणी कॉंग्रेसी सरकारने घेतलेली भुमिका ही जात्यंधच आहे. रमाबाई हत्याकांडातील गोळीबार करणारा मनोहर कदम व खैरलांजी प्रकरणातील गावगुंड यांना शासन प्रशासन व जातीव्यवस्था या सर्वांचे संरक्षण मिळते हे ईथे लक्षात घ्यायला हवे.
अशा परिस्थितीत लोकशाही व्यवस्थेला असलेला धोका तीव्र होतो. विरोधी पक्षाची भूमिका अशावेळी महत्वाची असते. परंतु भारतातील विरोधी पक्ष कमकुवत झाले आहेत. कारण विरोधी पक्ष सत्ताधारी पक्ष एकाच संकुचित संस्कृतीची दोन रुपे आहेत. ही विकृत व संकुचित संस्कृती विरोधी पक्षाला निरपेक्ष व निस्वार्थ भुमिका बजावण्यापासून सतत विरोध करते. या अंतर्विरोधामुळे नकाराचा अधिकार गाजवून सत्ताधारी पक्षावर सतत अंकुश ठेवायची ताकद विरोधी पक्ष हरवून बसला आहे.
3) कायदा व प्रशासकीय क्षेत्रात समतेचा अभाव.
कायद्यासमोर सर्वसमान असतात. न्यायपालिका निरपेक्ष असायला हवी. अन्याय दुर करणे व अपराध्यांना शिक्षा करणे हे न्यायपालिकेचे कार्य, जात, पंथ, प्रांत, भाषा वा लिंग अशा कोणत्याही घटकापुढे बाधित व्हायला नको. न्यायधीश व न्यायपालिका त्रयस्थ असायला हवी.
प्रशासनामध्ये समता असायला हवी. प्रशासकीय कर्मचार्यानी कोणत्याही संकुचित वादाला शरण न जाता कारभार करायला हवा. लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेता कामा नये.
प्रशायकीय कारभारामध्ये आज प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे. वर्षानुवर्षे राजकीय हस्तक्षेपान्मुळे प्रशासकीय कर्मचारी नियमांचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढले आहे. लाचखोरी वाढली आहे. सामान्य माणूस हैरान आहे. याचा गैरफायदा हजारेंसारखी बीन-बुडाची माणसे घेत आहेत. लोकपालसारखी अनावश्यक व संविधानविरोधी व्यवस्था निर्माण करण्यासाठी हजारेंची टीम जोरदारपणे कामाला लागली आहे. त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे.
हजारेंच्या टीमला शासकीय कर्मचार्यांचा लेखा-जोखा घ्यायचा आहे. त्यासाठी त्यांना लोकपाल हवा आहे. परंतु कॉर्पोरेटच्या नावाखाली चाललेल्या प्रंचंड भ्रष्टाचाराला हात लावायचा नाही. एनजीओ च्या नावाखाली करोडो रुपयांचा गैरव्यवहार करणार्यांनाही हजारे टीम हात लाऊ ईच्छित नाही. कारणलोकशाहीच्या स्तंभापैकी एक प्रशासन ढीले केले की रिझर्वेशनमुळे विकासाची वाट मोकळी झालेल्या मागासवर्गीय व अल्पसंख्य जाती-जमातीच्या लोकांना पुर्वीच्या स्थितीत ढकलायला सोपे होईल आणि प्रशासन नष्ट व भ्रष्टकेले की लोकशाही अजून खिळखीळी होईल त्यावेळी कॉर्पोरेट सेक्टरच्या ताब्यात देश देता येईल. हा हजारेंचा आणि त्यांच्या पाठीराख्यांचा डाव 'मी अण्णा' म्हणून नौटंकी करणार्या सामान्य लोकांच्या लक्षात येत नाही आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रशासन लोकाभिमुख असण्याची शक्यता तरी असते परंतु कॉर्पोरेट सेक्टरच्या तथाकथित जगत लोकाभिमुख सोडाच परंतु गुणगुणवत्तेच्या नावाखाली लोकविरोधी म्हणजेच राष्ट्रद्रोही कामात मग्न असते. एक प्रचंड शोषण व्यवस्था कॉर्पोरेट सत्तेच्या नावावर उभी राहत आहे त्याविरुद्ध हजारे एक शब्दही बोलत नाही.
4) संविधानिक नितीमत्तेचा अभाव:-
संविधानाबद्दल अनेक लोकांचे मत चांगले नाही. त्यांचे अज्ञान हे त्याचे कारण आहे. भारताचे संविधान भारताची विशिष्ट परिस्थिती व जागतिक परिस्थिती समोर ठेऊन बनविले गेले आहे. ते उत्कृष्ट आहे. जगातील अनेक विद्वानांनी गौरविले आहे व अनेक देशांनी त्यातील कित्येक गोष्टी स्वीकारल्या आहेत.
संविधानाच्या अंमलबजावणी करणार्या व्यक्तींवर व समुहावर संविधान व देशाचे भवितव्य अवलंबुन आहे.
संविधान बदलावे या मताचे अनेक जज आहेत. मी त्यांच्या मताशी सहमत आहे परंतु त्यांनी हे लक्षात घ्यायला हवे की, संविधान हा फक्त नियमांचा सांगाडा आहे. संविधानिक नितीमत्तेतूनच या सांगाड्याला रक्त व मांस मिळेल असे बाबासाहेब म्हणाले होते.
बाबासाहेबांनी संविधानिक नितीमत्तेला अत्यांतिक महत्व दिले आहे. राजकीय पक्षांचे विशेषत: सत्ताधार्यांचे वर्तन संविधानिक नितीमत्तेला धरुन असायला आहे. न्याय स्वातंत्र्य समात व बंधुत्व या संविधानिक मुल्यांना धरुनच त्यांचे वर्तन असायला हवे परंतु, जिभेवर संविधान व मनात मनुस्मृती असेल तर ही लोकशाही व्यवस्था व राष्ट्राशी केलेली गद्दारी ठरेल. असे लोकशाहीच्या नावावर तमाशा करतील आणि प्रत्यक्षात हुकुमशाहीच्या दिशेने, अराजकच्या दिशेने वाटचाल करतील. आजचे वास्तव हेच दर्शवित नाही काय?
5) अल्पसंख्यांची गळचेपी होत आहे.
या देशात अल्पसंख्यकांची सतत गळचेपी होत आली आहे. सर्वप्रकारचे शोषण अन्याय अत्याचार त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे मुस्लिम, बोद्ध, ख्रिश्चन, पारसी, शीख ई. अल्पसंख्य नेहमीच भयग्रस्त जीवन जगत आले आहेत. प्रस्थापित मुठभर मनुवादी व भांडवलदार लोक नेहमीच अल्पसंख्यकांना प्रगती पासून दुर ठेवत आले आहे.
हिंदु धर्माअंतर्गत प्रत्येक जात ही सुद्धा अल्पसंख्य आहे. हिन्दु समाजव्यवस्था म्हणजे जाती जातीमधील झगडाच होय. त्यामुळे प्रत्येक जात भयग्रस्त आहे. परिणामी प्रत्येक जात प्रतिशोधाच्या मानसिकतेत आहे. हि भयग्रस्तता जातीव्यवस्थेमध्ये वरुन खाली वाढत जाणारी आहे. या अवस्थेत जी मानसिकता तयार होते ती लोकशाहीला घातक आहे. आज यातले बहुतेक जातीय व धार्मिक अल्पसंख्य असंविधानिक मार्गाने वाटचाल करू लागले आहेत. त्यांना उचकविण्यास देशी-विदेशी आतंकवादी व दहशतवादी क्रियाशील झाले आहेत.
6) समाजाची नीतीमत्ता ढासळत आहे.
नीतीमत्तेचे डोस या देशात सातत्याने पाजले जातात. प्रसारमाध्यमे, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक संस्था व संघटना, भोन्दु बाबा, बुवा, महाराज, गुरुजी, साध्वी सतत नीतीमत्तेच्या गप्पा मारतात. तरीही समाजातील अनैतिकता वाढत चालली आहे. कारण यांच्या "कथनी आणि करणी" मध्ये फरक आहे. आज या संस्था, संघटना म्हणजे पैसे कमविण्याचे उघड मार्ग झालेले आहेत. देशभर अध्यात्माने हैदोस घातला आहे. लोकशाहीच्या यशस्वितेसाठी नीतीमान समाजाची गरज आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकशाहीच्या प्रेरणा बुद्धाकडून घेतात. भिक्खु संघाचे कामकाज संसदिय पद्धतीने चालत असेल आणि त्याचा पाया पंचशिल व अष्टांगमार्ग हाच होता. बुद्धाला सोडून नीतीमान समाजाची निर्मिती शक्य होणार नाही.
7) विवेकी लोकमत
देशात अनेक धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्म आपल्या अनुयायांना धार्मिक बंधनात अडकवितो. दुसर्या धर्माप्रति वैर शिकवले जाते. अनेकदा विकृतींचाच धर्म म्हणून प्रसार केला जातो. देव आणि धर्म यांच्या नावावर लोकांना अंधश्रद्धा व धर्मांधता यात अडकून ठेवले जात आहे. त्यामुळे विवेकाचा विसर पडतो. दंगली माजतात. अराजकता वाढते. व्यक्ती व समाजाच्या विकासाचा मार्ग बनन्याऎवजी धर्म व्यक्तीला गुलाम बनवितो व शोषण करतो. म्हणूनच व्यक्ती विकासासाठी, सुदृढ समाजासाठी व बलवान राष्ट्राच्या निर्मितीसाठी विवेकी समाजाची निर्मिती आवश्यक आहे.
विवेकी लोकमत घडविण्यासाठी सतत प्रबोधनाची आवश्यकता असते. त्यासाठी संघठन व प्रसारमाध्यमांची मोठीच गरज असते.
वरील चर्चेच्या पार्श्वभुमीवर भारताच्या विशिष्ट संदर्भात अनेक आव्हाने उभी असल्याचे लक्षात येईल. भारताला खर्या अर्थाने राष्ट्र घडवायचे असेल तर जात व धर्म यांना नष्ट करावे लागेल. तरच समाजाधिष्ठीत, लोककल्याणकारी समाजाची व राष्ट्राची निर्मिती शक्य होईल. या कामी बाबासाहेबांची रिपब्लिकन विचारधाराच परिपूर्ण आहे. असे माझे ठाम मत आहे.
डॉ.बाबासाहेबांची रिपब्लिकन विचारधारा, त्यांनी दिलेल्या लोकशाहीच्या यशस्वीतेसाठीची पुर्व अट आहे व
या सगळ्यांचा पाया असलेले बुद्ध तत्वज्ञान हे केवळ या देशाचीच नव्हे तर जगाची पुनर्रचना करण्याची पूर्ण ताकद ठेवते असा माझा ठाम विश्वास आहे. म्हणूंच मी रिपब्लिकन आहे!
-प्रो. प्रेमरत्न चौकेकर
मोबाईल : 9757088520
Friday, February 3, 2012
ब्राह्मण जात पंचायत

नव्या पिढीला संगणकाबरोबरच संध्या ही शिकवा.
जोपर्यंत ब्राह्मनांचे कर्तृत्व आहे तोपर्यंत या राष्ट्राचा धर्म व संस्कृती कधीच मरणार नाही. हिंदुना एकत्र आणण्याचे उत्तरदायित्वही याच समाजाकडे आहे.
भारतात ब्राह्मण प्राचीन काळापासून अल्पसंख्यच होते. अनेक वैध व अवैध मार्ग अवलंबुन ब्राह्मणांनी बहुजनांवर हजारो वर्षे वर्चस्व गाजविले. स्वातंत्र्योत्तर काळात ब्राह्मणांना असुरक्षित वाटू लागले. त्यावर उपाय म्हणून काही ब्राह्मणांनी एकत्र येऊन ब्राह्मण महासंघाची स्थापणा केली. या ब्राह्मण महासंघाच्या वतीने दरवर्षी ब्राह्मण अधिवेशने होत असतात. या वर्षिचे अखिल भारतीय ब्राह्मण अधिवेशन नुकतेच पुण्यात झाले. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शंकर अभ्यंकर यांनी वरील प्रमाणे ब्राह्मण जातीचे दुखणे व्यक्त केले.
अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण सभेचे दोन दिवसीय अधिवेशन दोन वर्षांपूर्वी घेतले होते. त्या अधिवेशनामध्ये लोकसत्ताचे संपादक कुमार केतकर यांनी बीज भाषण केले होते. त्या भाषणामुळे त्यांना धक्काबुक्की झाली होती. हे वृत्त सर्वच वृत्तपत्रांनी छापले व त्या कृत्याचा निषेध ही केला गेला होता.
त्या भाषणात केतकरांनी वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. केतकरांच्या कथनामधून ब्राह्मण जाती अंतर्गत चाललेले विविध अंत:प्रवाह प्रतिबिंबित होतात. त्यात त्यांना गोमांस भक्षणापासून ते आंतरधर्मीय विवाह, परदेशगमन, पाश्चिमात्य संस्कृतीशी लगट हे सर्व अगदी विस्ताराने मांडले आणि हेच कळीचे मूळ ठरले.
ब्राह्मणांच्या अधिवेशनामध्ये ब्राह्मणांची वाहवा व्हावी, ब्राह्माणांच्या यशाचे गुणगान व्हावे, विविध क्षेत्रातील यशस्वीतेचे कौतुक व्हावे, इतरांपेक्षा ब्राह्मण जात आजही श्रेष्ठ आहे हे पुन्हा एकदा जाहीर व्हावे ही अपेक्षा असतेच. या अपेक्षेने खरेतर क्षोतृवर्ग अभिमानाने किंवा गर्वानेच अगदी वेळात वेळ काढून आलेला असताना त्यांच्यासमोर ब्राह्मणांची दुसरी बाजू मांडली जावी हे सर्व अनपेक्षित होते. जात पंचायत बोलाविली होती ती आपले श्रेष्ठत्व ओरडून सांगण्यासाठी आणि येथे एक ब्राह्मण जातीची उणीदुणी काढतो हे पचनी पडने नव्हते.
कुमार केतकर ब्राह्मणांची व्याख्या करताना म्हणाले, जात जन्माने ठरु नये, जो जात पाळत नाही, भेदाभेद करीत नाही, कुणी उच्च व कुणी नीच असे मानत नाही, कुणाला कमी लेखत नाही, कुणाला वरचे मानत नाही, जो ज्ञानमार्गाला स्वीकारतो, जो ज्ञानप्रसार करतो, जो जे वांछील तो ते लाहो असे मनापासून म्हणतो. अवघ्या विश्वाची चिंता वाहतो, आणि हे विश्व दुरितांचे तिमीर जाओ बदलण्याचा प्रयत्न करतो तो ब्राह्मण अशी व्याख्या आपण करुया. मूळ ब्राह्मण संज्ञेची व्याख्या तीच होती. ती व्याख्याच भ्रष्ट झाल्यामुळे जात जन्मावरुन ठरु लागली. आणि ब्राह्मण कुळात जन्म घेणारा तो ब्राह्मण अशी संकुचित मांडणी रुढ झाली. ब्रह्माचा, विश्वाचा, विश्वजन्माचा, विश्वातांचा, मनाचा, समाजाचा अखंड शोध घेणारा ज्ञानयोगी म्हणजे ब्राह्मण असे आपण मनापासून स्वीकारले की आपल्याला सॉक्रेटिस आणि बट्राड रसेल, येशू आणि बुद्ध ज्ञानयोगी व सेवायोगी भासू लागतील.
असा दृष्टीकोन घेतला कि लक्षात येईल की ज्ञानेश्वर या ब्राह्मणाला वाळीत टाकणारे ब्राह्मण की निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई हे ब्राह्मण! तुकारामाला जात चिकटवून त्या तुक्याच्या अभंगातले वैश्विक ज्ञान कमी लेखणारे ब्राह्मण की तुकाराम ब्राह्मण? ब्राह्मण ही जात आहे असे म्हणणेच हे अब्राह्मणी आहे. ती जन्माने ठरते असे म्हणणे म्हणजे ज्ञानमार्गी वृत्तीचा अपमान करणे आहे.
केतकरांचे हे विचार वाचले कि कुणाचेही मनोरंजन होईल. कारण, जात जन्मानेच ठरते जो जात पाहतो, भेदाभेद करतो, उच्चनीच असा भेदभाव करतो, इतरांना कमी लेखतो, स्वत:ला सर्वोच्च मानतो, जो शब्द प्रामण्याचा स्वीकार करतो, ठेवीले अनंते तैसेची राहावे असे दुस-यांना शिकवितो, अवघ्या विश्वाच्या शोषणाची समाजव्यवस्था निर्माण करतो, आणि दुरितांचे तिमिर वाढविण्यासाठी देव, देवता, धर्म, धर्मग्रंथ, प्रेषित, बाबा, बुवा, महाराज, नशीब, अंधश्रद्धा, ज्योतिष अशा सर्व खोटानाट्या गोष्टींचा प्रचार प्रसार करतो तोच खरा ब्राह्मण अशी ब्राह्मणांची गेल्या हजारो वर्षाची ओळख आहे.
बहुजन समाजाला नाडून त्यांचे सर्वांगाने शोषण करणारी जात म्हणजे ब्राह्मण जात, हे बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशनाला आलेल्या ब्राह्मणांना ठाऊक होते. म्हणूनच त्या वास्तवाच्या उलट जेव्हा कुमार केतकरांनी आदर्शवादी परुंतु वास्तव नसलेली भूमिका घेतली तेव्हा त्यांना फटके पडणार हे निश्चितच होते.
ब्राह्मण झाला भ्रष्ट तरी तीन्ही लोकी श्रेष्ठ. हा ब्राह्मण धर्माचा मूलमंत्र आहे. रवी शास्त्रीने गोमांस खाल्ले किंवा काही पुणेरी तरुणींनी पाकी पुरुषांशी लग्न केले तरी त्यामुळे गोमांसाला सदगती प्राप्त होते व पुणेरी कन्यकांमुळे कदाचित पाकी तरुणांना पुण्य लाभते असेल परंतु ब्राह्मण्याला मात्र काळीमा लागत नाही हीच तर ब्राह्मण्यांची खासियत आहे. सौ चुहे खाके भी ये बिल्ली याने की ब्राह्मण पाक रहता है!
तेराव्या शतकात विठ्ठल कुलकर्णी उपरती झाली होती. संन्यास मार्ग सोडून तो बिचारा संसारात रममाण झाला. त्याच्या संसाराला चार गोमटी फळे आली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई. परंतु संन्याशाने संसार केला व मुलांनाही जन्म दिला हे ब्राह्मण्यांच्या कक्षेत बसत नाही असे वाटल्यामुळे विठ्ठल कुलकर्ण्याला बहिष्कृत करण्यात आले. त्याने आत्महत्या केली. पुढे त्याच्या चारही मुलांना बहिष्कृत जीवन जगावे लागले. या विरोधात त्या चारही मुलांनी जंग जंग पछाडले.
ज्ञानियाचा राजा ज्ञानेश्वर याने ब्राह्मणांची, ब्राह्मण पंडितांची दारे ठोठावली. ब्राह्मणसभामधून दाद मागितली ती कशासाठी?
आपले ब्राह्मणत्व परत मिळावेच म्हणूणच ना? ज्ञानियाचा राजा झाला तरी तो ब्राह्मण नसेल तर मग सगळेच बुडाले! म्हणून सा-या जगाला ज्ञानेश्वरीतून उपदेश पाजणा-या या ज्ञानियाच्या राजालाही शेवटी आपले जन्मजात ब्राह्मणत्व परत मिळावे म्हणून आयुष्यभर झगडावे लागले. ज्ञानमार्गातून ब्राह्मणत्व मिळाले तरी जन्मजात ब्राह्मणत्व श्रेष्ठ असते हे ज्ञानियाने स्वत:च्या कृतीने सिद्ध करुन आपणही त्या जातीव्यवस्थेचे समर्थक आहोत हेच सिद्ध करण्याचा खटाटोप आयुष्यभर केला नाही काय? अर्थात जात पंचायतीने त्यांना ब्राह्मणत्व नाकारले ते नाकारलेच.
त्यामुळेच जो जे वांछील तो ते लाहो असे ज्ञानेश्वराने कितीही जोराने ओरडून सांगितले तरी एखाद्या महाराने, मांगाने वा चांभाराने ब्राह्मण जात मागितली असती तर ती त्याला मिळाली असती का? ती तर खुद्द ज्ञानेशाला मिळाली नाही! गेल्या सातशे आठशे वर्षाची ही शब्दांची आतशबाजी जीवापड जपणारी जातीव्यवस्था आता कुमार केतकर तोडायला चालले आहेत ती कशी?
ते सुद्धा ब्राह्मण या शब्दाची नवी व्याख्या करू इच्छितात. परंतु व्याख्या बदलली तरी आश्य बदलेलेच असे नाही. आणि आशय बदलला तरी ढाचा बदलत नाही, वास्तव बदलत नाही.
केतकर ब्राह्मण, ब्राह्मण्य, ब्राह्मणसभा या सर्वांनाच नाकारु का शकत नाहीत? कारण कुठेतरी त्यांच्याही मनात सुप्तपणे ब्राह्मण लपलेले असते. पेरलेले असते. नकारात क्रांतीची बीजे असतात.
ज्यांना क्रांती करायची असतेते, जे जे अकुशल असते ते ते नाकारताना पळवाटा शोधित नाहीत.
ज्ञानेश्वर ते कुमार केतकर, अभ्यंकर हा जवळ जवळ साडेसातशे वर्षांचा काळ! या एवढ्या काळात जगात खुप उलथापालथी झाल्या. विजयनगरचे यादवांचे राज्य गेले, यादवकालीन मराठी गेले, आदिलशाही आली गेली, निजामशाही गेली, बादशाही आली गेली, पेशवाई गळाली, ब्रिटीशही गेले परंतु..
ब्राह्मण्य अजून तसेच आहे म्हणून जातीव्यवस्था तशीच आहे.
ज्ञानेस्वराने रेड्याच्या तोंडून वेद वदविले. वेदांचा उच्चार शुद्र व अतिशुद्रानी करू नये, असा मनुस्मृतीचा ब्राह्मणी दंडक! त्यामुळे वेद वदविण्यासाही महार, मांग, चांभार, भंगी, आदिवासी तर जाऊ द्याच पण तेली, तांबोळी, कुणबी, लोहार, सुतार ईत्यादीपैकी कोणीच ज्ञानेश्वराला चालला नाही. एवढेच कशाला सो कॉल्ड क्षत्रिय मराठ्याला (शहाण्यव कुळी) सुद्धा ज्ञानेश्वराने नाकारले. त्याने रेड्याला पकडले! (आता वेद केवळ रेड्याच्याच लायकीचे आहेत असे ज्ञानेश्वराला सुचवायचे असेल तर गोष्ट वेगळी)
जाती निर्मुलन व जाती व्यवस्थेचे उच्चाटन करुन समाताधिष्ठीत समाजाची निर्मिती करणे ही आज काळाची गरज आहे. परंतु जाती उत्थानाच्या कामाला विशेष वेग आला आहे. आपापली जात इतरांपेक्षा श्रेष्ठ कशी हे सिद्ध करण्याचा खटाटोप सुरु आहे. आतापर्यंत कुठल्या जाती श्रेष्ठ झाल्या ठाऊक नाही. पण ज्ञानेश्वराने रेड्याच्या जातीचे उत्थान केले व त्याला ब्राह्मणत्व देऊ केले हे मात्र नाकारता येत नाही. आता केतकर आणि अभ्यंकर आणि त्यांचे रेडे कुणाकुणालाअ जाती श्रेष्ठत्व देतात हे पाहणे एवढेच आपल्या हाती आहे! ब्राह्मण जात पंचायतीकडून जास्त अपेक्षा करणे उचित नाही!
इंडिया दॅट इज भारत असे ठणकाऊन सांगणार-या भारतीय संविधानाने या देशातल्या तमाम वंचिताना, दुखि:ताना, शोषिताना, सामाजिक, आर्थिक, व राजकीय न्याय अभिव्यक्ती, श्रद्धाव उपासना यांचे स्वातंत्र्य, संधी व सन्मानाची समानता आणि राष्ट्राचे ऎक्य व एकात्मता व व्यक्तिची प्रतिष्ठा साधणारे बंधुत्व यांची अमुल्य देणगी व हमी दिल्यापासून म्हणजे 26 जानेवारी 1950 पासून ब्राह्मणी अहंगंडाला, वर्चस्वाला, जात्यंधतेला, धर्मांधतेला जबरदस्त धक्का पोहचला व ब्राह्मणी व्यवस्था खिळखिळी होऊन मृत्युच्या उंबरठ्यात उभी आहे हे मात्र यातून स्पष्ट जाणवत राहते!
प्रा. प्रेमरत्न चौकेकर
प्रा. प्रेमरत्न चौकेकर
Subscribe to:
Posts (Atom)